AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेक्स अ‍ॅडिक्ट, डेटिंग अ‍ॅप्स, चॅट, एड्स आणि… सातव्या मजल्यावर काय सापडलं?; सरस्वती मर्डर प्रकरणातील धक्कादायक खुलासे काय?

आरोपीच्या मोबाईलमध्ये डेटिंग अ‍ॅप्सही मिळाले आहेत. तो अनेक डेटिंग अ‍ॅप्सवर अ‍ॅक्टिव्ह होता. या अ‍ॅपद्वारे तो महिलांशी चॅट करत होता. पोलिसांना या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.

सेक्स अ‍ॅडिक्ट, डेटिंग अ‍ॅप्स, चॅट, एड्स आणि... सातव्या मजल्यावर काय सापडलं?; सरस्वती मर्डर प्रकरणातील धक्कादायक खुलासे काय?
Manoj SaneImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 17, 2023 | 8:23 AM
Share

मुंबई : मीरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्याकांडाबाबत धक्कादायक खुलासे होत आहेत. ज्या इमारतीत सरस्वतीची हत्या करण्यात आली, त्या इमारतीच्या सातव्या मजल्यावर 35 मृतदेहाचे तुकडे सापडले आहेत. हे सर्व तुकडे सरस्वतीचेच असल्याचं फॉरेन्सिक रिपोर्टमधून स्पष्ट झालं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र, तिच्या शरीराचे काही तुकडे गायब झाले आहेत. त्याचा रिपोर्ट अजूनही आलेला नाही.

सरस्वतीच्या मृतदेहांच्या तुकड्यांचा डीएनए आणि सरस्वतीच्या बहिणीच्या डीएनएही जुळला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मनोज साने आणि सरस्वती हे दोघे मीरा रोडच्या आकाशदीप सोसायटीतील सातव्या मजल्यावर राहत होते. त्याने सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर ते कुकरमध्ये शिजवले होते. त्याचा पोलीस तपास करत आहेत.

आधीच हत्येची तयारी

मनोज साने याने सरस्वतीच्या हत्येची आधीच तयारी केली होती, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. मनोजने 3 जून रोजी रात्री 10 ते 12 वाजेच्या दरम्यान त्याने सरस्वतीची हत्या केली. हे सुनियोजित हत्याकांड होतं हे स्पष्ट झालं आहे. कारण आरोपीने काही महिन्यांपूर्वीच मार्बल कटर मशीन खरेदी केली होती. त्यानंतर त्याने 4 जून रोजी झाड कापण्याची मशीनही खरेदी केली होती, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

मात्र, आपण सरस्वतीची हत्या केली नाही, असं त्यांच म्हणणं आहे. तो पोलिसांना वेगवेगळ्या कहाण्या ऐकवत आहे. सरस्वतीने विष घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे आपल्यावर आरोप येईल म्हणून घाबरल्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलंय. मात्र, त्याची कोणतीच थिअरी पोलिसांसमोर चालताना दिसत नाहीये. पोलिसांना या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.

अनेक महिलांशी संबंध

मनोज सानेचे अनेक महिलांशी संबंध होते. त्याच्या फोनमध्ये अनेक महिलांशी त्याने केलेल्या चॅटिंग हाती आल्या आहेत. आरोपीच्या मोबाईलमध्ये डेटिंग अ‍ॅप्सही मिळाले आहेत. तो अनेक डेटिंग अ‍ॅप्सवर अ‍ॅक्टिव्ह होता. या अ‍ॅपद्वारे तो महिलांशी चॅट करत होता. पोलीस आता हा रेकॉर्ड काढत आहेत. मनोजला एड्स होता. त्याचे सरस्वतीसोबत शारीरिक संबंध नव्हते. मात्र, तो सेक्स अ‍ॅडिक्ट होता, अशी माहितीही समोर आली आहे.

किटकनाशक देऊन मारले

मनोज सानेने सरस्वतीला किटकनाशक देऊन मारल्याचं सांगितलं जात आहे. गुन्हा घडण्यापूर्वी त्याने बोरिवली पश्चिमेकडील एका दुकानातून किटकनाशक खरेदी केलं होतं. ही हत्या 3 जून नव्हे तर 4 जूनला झाली असावी असा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलिसांनी 20 लोकांची साक्ष नोंदवली आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.