अंडरवर्ल्ड गँगस्टर फहीम मचमचच्या नावे मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे 50 लाखांची मागणी

मुंबईतील घाटकोपर भागात राहणाऱ्या एका बड्या व्यावसायिकाला अंडरवर्ल्ड गँगस्टर फहीम मचमचच्या नावाने धमक्या देण्यात आल्या आहेत.

अंडरवर्ल्ड गँगस्टर फहीम मचमचच्या नावे मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे 50 लाखांची मागणी
अंडरवर्ल्ड गँगस्टरच्या नावे खंडणीखोरी

मुंबई : मुंबईतील एका बड्या व्यावसायिकाला अंडरवर्ल्ड गँगस्टरच्या नावे खंडणीसाठी फोन आला आहे. कुख्यात डॉन फहीम मचमच (Fahim Machmach) याच्या नावाने बिझनेसमनला धमक्या देण्यात आल्याचा आरोप आहे. फहीम मचमच हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) गँगचा सदस्य आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. (Mumbai Businessman gets Extortion Call on name of Fahim Machmach of Dawood Gang)

50 लाखांच्या खंडणीची मागणी

मुंबईतील घाटकोपर भागात राहणाऱ्या एका बड्या व्यावसायिकाला अंडरवर्ल्ड गँगस्टर फहीम मचमचच्या नावाने धमक्या देण्यात आल्या आहेत. परदेशातून आलेल्या फोन कॉलद्वारे या गुंडाने 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. व्यापाऱ्याच्या तक्रारीनंतर घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर आता गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

फहीम मचमचच्या ऑडिओ सॅम्पलसोबत पडताळणी

फहीम मचमच हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या गँगमधील छोटा शकीलचा हस्तक मानला जातो. खंडणीसाठी आलेला फोन हा VOIP इंटरनेट कॉल असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांकडे असलेल्या फहीम मचमचच्या ऑडिओ सॅम्पलसोबत संबंधित कॉल जुळत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

स्थानिक टोळीकडून खंडणी वसुलीचा संशय

अंडरवर्ल्ड डॉनच्या नावाखाली एखादी स्थानिक टोळी खंडणी वसुलीसाठी फोन करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. परंतु तपास निर्णायक वळणावर असल्यामुळे आणि पीडित व्यावसायिकाच्या जीवाला धोका असल्यामुळे पोलिसांनी याविषयी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.

संबंधित बातम्या :

बटाटा विक्रेता ते मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज माफिया; कोण आहे फारुख बटाटा?

डोंगरीत ड्रग्जची फॅक्टरी, दाऊदचा हस्तक दानिश चिकना राजस्थानमध्ये जेरबंद

आधी दानिश चिकनाला अटक, आता राजिक चिकनाला NCB चे समन्स, दाऊदच्या हस्तकांवर कारवाईसत्र

(Mumbai Businessman gets Extortion Call on name of Fahim Machmach of Dawood Gang)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI