AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aruna Shanbaug | 25 व्या वर्षी लैंगिक अत्याचार, 42 वर्ष मृत्यूशय्येवर, अरुणा शानबाग यांची करुण कहाणी

1973 मध्ये परळ येथील किंग एडवर्ड मेमोरियल अर्थात केईएम हॉस्पिटलमध्ये कनिष्ठ परिचारिका म्हणून काम करत असताना अरुणा शानबाग यांच्यावर वॉर्ड बॉय सोहनलाल भरत वाल्मिकी याने लैंगिक अत्याचार केला होता. या हल्ल्यात गळ्याभोवती साखळीचा फास आवळला गेल्याने त्या निश्चल अवस्थेत गेल्या होत्या.

Aruna Shanbaug | 25 व्या वर्षी लैंगिक अत्याचार, 42 वर्ष मृत्यूशय्येवर, अरुणा शानबाग यांची करुण कहाणी
Aruna Shanbaug
| Updated on: Nov 26, 2021 | 7:03 AM
Share

मुंबई : जवळपास 42 वर्ष मृत्यूशय्येवर घालवल्यानंतर अरुणा शानबाग (Aruna Shanbaug) यांनी 18 मे 2015 रोजी मुंबईत अखेरचा श्वास घेतला होता. 1973 मध्ये वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्यानंतर अरुणा शानबाग जवळपास पुढील 42 वर्ष मृत्यूशय्येवर होत्या. त्यांना दयामरण देण्यासाठी कोर्टात याचिका झाल्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या होत्या. अखेर वयाच्या 67 व्या वर्षी त्यांचा न्यूमोनियाने अंत झाला.

1973 मध्ये परळ येथील किंग एडवर्ड मेमोरियल अर्थात केईएम हॉस्पिटलमध्ये कनिष्ठ परिचारिका म्हणून काम करत असताना अरुणा शानबाग यांच्यावर वॉर्ड बॉय सोहनलाल भरत वाल्मिकी याने लैंगिक अत्याचार केला होता. या हल्ल्यात गळ्याभोवती साखळीचा फास आवळला गेल्याने त्या निश्चल अवस्थेत गेल्या होत्या.

24 जानेवारी 2011 रोजी अरुणा शानबाग यांनी या अवस्थेत आयुष्याची 37 वर्षे काढल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पत्रकार पिंकी विराणी यांनी दाखल केलेल्या इच्छामरणाच्या याचिकेची दखल घेतली. त्यानंतर शानबाग यांच्या तपासणीसाठी एक वैद्यकीय समिती स्थापन करण्यात आली. न्यायालयाने 7 मार्च 2011 रोजी विराणींची याचिका फेटाळली. मात्र भारतात इच्छामरणाला (passive euthanasia) परवानगी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. अरुणा शानबाग यांचे 18 मे 2015 रोजी निमोनियामुळे निधन झाले. जवळजवळ 42 वर्षे त्या मृत्यूशय्येवर (vegetative state) होत्या.

अरुणा शानबाग यांची कहाणी

अरुणा शानबाग यांचा जन्म 1948 मध्ये कर्नाटकातील उत्तर कन्नडमधील हल्दीपूर येथे झाला. त्यांनी मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम सुरु केले. हल्ल्याच्या वेळी त्याच रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरशी त्यांचा साखरपुडा झाला होता.

हल्ल्याच्या दिवशी काय घडलं

27 नोव्हेंबर 1973 च्या रात्री त्यावेळी 25 वर्षांच्या असलेल्या अरुणा शानबाग यांच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये कंत्राटी सफाई कामगार असलेल्या सोहनलाल वाल्मिकी याने लैंगिक अत्याचार केला. रुग्णालयाच्या तळघरात कपडे बदलत असताना सोहनलालने त्यांच्यावर हल्ला केला होता. त्याने कुत्र्याच्या साखळीने गळा दाबून त्यांच्यावर अत्याचार केले होते. यामुळे त्यांच्या मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला, परिणामी मेंदूच्या स्टेमला इजा झाली, गर्भाशयाला दुखापत झाली आणि अंधत्वही आले. दुसऱ्या दिवशी सकाळी 7:45 वाजता एका सफाई कामगाराला त्या सापडल्या होत्या.

सोहनलालची सात वर्षांनी सुटका

सोहनलालला मारहाण आणि दरोडा प्रकरणी दोषी ठरवण्यात आले. सात वर्षांच्या दोन शिक्षा एकाच वेळी भोगून झाल्यानंतर त्याला 1980 मध्ये सोडण्यात आले. मात्र त्याला बलात्कार, लैंगिक अत्याचार किंवा अनैसर्गिक लैंगिक गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नाही, अन्यथा त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकली असती.

या हल्ल्यानंतर मुंबईतील परिचारिकांनी अरुणा शानबाग यांची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि परिचारिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, या मागणीसाठी संप केला होता. 1980 च्या दशकात, बृहन्मुंबई महानगरपालिकेने अरुणा शानबाग यांना केईएम हॉस्पिटलच्या बाहेर हलवण्याचे दोन वेळा प्रयत्न केले. सात वर्षांपासून त्यांनी बेड व्यापून ठेवल्याचं कारण पुढे करण्यात आलं होतं. त्यावेळी केईएमच्या परिचारिकांनी विरोध करत बीएमसीची योजना हाणून पाडली.

न्यूमोनियाने अखेरचा श्वास

मृत्यूच्या काही दिवस आधी अरुणा शानबाग यांना न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले होते. त्यांना हॉस्पिटलच्या वैद्यकीय अतिदक्षता विभागात (एमआयसीयू) हलवण्यात आले आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. 18 मे 2015 रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयातील परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार केले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.