AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : बनावट पासपोर्टवर 10 वर्षे करत होता परदेशवारी, ‘असा’ अडकला एटीसीच्या जाळ्यात

तब्बल दहा वर्षे तो शासनाच्या सरकारच्या धूळफेक करत होता. बनावट पासपोर्ट बनवून दहा वर्षे परदेशवारी करत होता. अखेर त्याचा हा बनाव उघडकीस आला आहे.

Mumbai Crime : बनावट पासपोर्टवर 10 वर्षे करत होता परदेशवारी, 'असा' अडकला एटीसीच्या जाळ्यात
बनावट पासपोर्टवर परदेश प्रवास करणारा अटकImage Credit source: TV9 Network
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jul 20, 2023 | 9:41 AM
Share

मुंबई / 20 जुलै 2023 : बनावट पासपोर्ट बनवून 10 वर्षे सरकारच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या आरोपीला अखेर एटीसीच्या पथकाने अटक केली आहे. बद्रे आलम नजीर अहमद शेख असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीने तब्बल 10 वर्षे अनेक वेळा बनावट पासपोर्टवर परदेशात प्रवास केला. आरोपीच्या गोवंडी येथील राहत्या घरातून पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पहिल्या पत्नीच्या भावाच्या नावाने आरोपीने बनावट पासपोर्ट बनवला होता. पोलिसांनी आरोपीकडून सर्व कागदपत्रेही जप्त केली आहेत. शेख याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 465, 471 आणि कलम 3 आणि पासपोर्ट कायदा 12 (1) (b) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी केली कारवाई

बनावट पासपोर्टद्वारे बद्रे आलम नजीर अहमद शेख नामक व्यक्ती सौदी अरेबियातून भारतात आल्याची माहिती शिवाजी नगर पोलिसांच्या एटीसीला मंगळवारी इमिग्रेशन आणि सिक्युरिटी टीमने दिली. यानंतर पीएसआय प्रशांत कांबळे (एटीसी) यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले. मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी शेखचा ठावठिकाणा शोधला. पोलीस शेखच्या घरी दाखल झाले असता त्याच्या राहत्या घरी एक व्यक्ती आढळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव बद्रे आलम नजीर अहमद शेख असल्याचे सांगितले. तसेच बनावट पासपोर्ट बनवल्याचेही नाकारले.

तपासात त्याच्याकडे तीन पासपोर्ट असल्याचे समोर आले. तिन्ही पासपोर्टमधील फोटो त्याच्या चेहऱ्याशी जुळत होता. या तिघांचीही नावे आसिफ इक्बाल शेख अशी होती. पासपोर्टमध्ये त्याच्या मूळ पत्त्याऐवजी कुरेशी नगर, कुर्ला पूर्व असा पत्ता लिहिला होता. विशेष म्हणजे त्याने दोनदा पासपोर्टचे नूतनीकरण केले होते, असे पोलिसांनी सांगितले.

पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली

पोलिसांनी शेखला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आसिफ इक्बाल शेख याच्या नावाने शेखने बनावट पासपोर्ट बनवला होता. आसिफ हा शेखच्या पहिल्या पत्नीचा भाऊ आहे. त्याने पासपोर्टमधील फोटो फक्त बदलला आणि तो सौदी अरेबियाला जाण्यासाठी वापरत राहिला. त्याच्याकडे आसिफ इक्बाल शेखच्या नावाची इतर कागदपत्रेही होती, त्यात त्याच्या पॅन कार्डचाही समावेश होता.

शेख हा इतर देशांमध्ये, मुख्यतः आखाती देशांमध्ये हवाला व्यवसाय करण्यासाठी जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. शेख सध्या पोलीस कोठडीत असून, त्याने यापूर्वी भारतात किंवा परदेशात केलेल्या संभाव्य गुन्ह्याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

Follow Us
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर ...
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर महाराष्ट्रात राजकारण करण्याची लायकी नाही!'
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्ग
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रवासी तासन् तास अडकले
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील...
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील संतापले, विचारला थेट सवाल!
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा...
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा चौकशी
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक...
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक आंदोलन!
सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील-पडळकर एकाच मंचावर
Sangli Padalkar Vs Patil : सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील- गोपीचंद पडळकर एकाच मंचावर
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअप...
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअपसाठी ब्रीच कॅंडी रुग्णालयात
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले, हा विजय...
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राज
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राजू शेट्टींचा सरकारला इशारा
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव,
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव, धर्मध्वजा धारक उपाधीही बहाल!