बसची सिमेंट बल्करला धडक, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर चार गाड्यांचा विचित्र अपघात, तिघांचा मृत्यू

बसची सिमेंट बल्करला धडक, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर चार गाड्यांचा विचित्र अपघात, तिघांचा मृत्यू
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात

मुंबई-पुणे महामार्गाच्या मध्यभागी काँक्रिटीकरण सुरु असताना प्रवासी बसने सिमेंट बल्कर आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या काही कामगारांना धडक दिली. तर आणखी एका वाहनाने बसला धडक दिली

मेहबुब जमादार

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 12, 2021 | 10:05 AM

रायगड : प्रवासी बसच्या धडकेत एक्सप्रेस वेवर काम करणाऱ्या तिघा कामगारांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर बोरघाट उतरताना हा अपघात झाला. दोघा कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाला उपचारासाठी नेले जात असताना वाटेत त्याने प्राण सोडले. अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

काय आहे प्रकरण?

मुंबई-पुणे महामार्गाच्या मध्यभागी काँक्रिटीकरण सुरु असताना प्रवासी बसने सिमेंट बल्कर आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या काही कामगारांना धडक दिली. तर आणखी एका वाहनाने बसला धडक दिली. अशा प्रकारे एकूण चार वाहनांचा विचित्र अपघात झाला.

दोघांचा जागीच मृत्यू

या अपघातात मृत्युमुखी पडलेले तीनही जण महामार्गावर काम करणारे कामगार आहेत. दोघा कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाला उपचारासाठी नेले जात असताना वाटेत मृत्यूने गाठले. तसेच आणखी दोन कामगार गंभीर जखमी असून त्यांना कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बसमधील प्रवासी किरकोळ जखमी

दरम्यान, बसमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत, मात्र काही जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. या प्रवाशांना इतर दोन बसने मुंबईला पाठवण्यात आले आहे.

आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्यची अॅम्ब्युलन्स व्यवस्था, बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, ॲप्सकॉन कंपनीचे कर्मचारी, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य तसेच मृत्युंजय देवदूत यांनी अपघात घडलेल्या ठिकाणी मदत केली.

संबंधित बातम्या :

मंडप डेकोरेशनचे पैसे मागितले म्हणून एकाला बेदम मारहाण; एकाला अटक तर दोघे फरार

आधी सामूहिक बलात्कार, मग पीडितेला दोन लाखांना विकले; राजस्थानमधील धक्कादायक प्रकार

 प्रेयसीशी जबरदस्तीचा प्रयत्न; नकार देताच गळफास लावला पण…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें