वेदनादायी आणि प्रचंड क्रूर, प्रेमविवाह, लग्नानंतर भांडणं, मुंब्राच्या फ्लॅटमध्ये बेशुद्ध पत्नीच्या तोंडात LPG पाईप खुपसला

मुंब्र्यातून प्रचंड भयानक, संतापजनक, वेदनादायी आणि क्रूर घटना समोर आली आहे. एका नराधमाने आपल्या पत्नीचीच निर्घृणपणे हत्या करुन गावी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण मुंब्रा पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

वेदनादायी आणि प्रचंड क्रूर, प्रेमविवाह, लग्नानंतर भांडणं, मुंब्राच्या फ्लॅटमध्ये बेशुद्ध पत्नीच्या तोंडात LPG पाईप खुपसला
मृतक महिला आणि आरोपी पती
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 5:04 PM

ठाणे : मुंब्र्यातून प्रचंड भयानक, संतापजनक, वेदनादायी आणि क्रूर घटना समोर आली आहे. एका नराधमाने आपल्या पत्नीचीच निर्घृणपणे हत्या करुन गावी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण मुंब्रा पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीला कोर्टाने 8 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रेमविवाह करुन आपत्यासह मुंब्रा परिसरातील जीवनबाग येथे राहणाऱ्या सदफ आणि आणि शाहनवाज यांचा सुखाचा संसार सुरु होता. एक मुलगीही झाली. त्यानंतर काही काळाने अज्ञात कारणावरुन दोघांमध्ये किरकिर सुरु झाली. अन् त्यांचा प्रेमविवाह भंगला.

रोजच्या भांडणाला वैतागलेल्या शाहनवाज याने आपल्या प्रेयसी पत्नीचाच काटा काढला. घरातील सिलेंडर गळती करुन बनाव करण्याचा प्रयत्न केला. जाताना त्याने आपल्यासोबत मुलगी घेतली आणि तो उत्तर प्रदेशातील मूळगावाच्या दिशेला निघाला होता. मात्र पोलिसांनी त्याचे मोबाईल लोकेशन ट्रेस केले आणि रेल्वे सुरक्षा बळाच्या सहाय्याने आरोपी शाहनवाज याला मध्यप्रदेशातील इटारसी स्टेशनवरच अटक केली. त्यानंतर त्याला मुंब्रा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आरोपी शाहनवाज याला न्यायालयाने 8 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी आपल्या पत्नीसोबत इतक्या निर्घृणपणे कसा वागू शकतो? असा सवाल उपस्थित केला जातोय.

नेमकं काय घडलं?

आरोपीचं पूर्ण नाव शाहनवाज सैफी असं आहे. तो आपली पत्नी सदफ सैफी आणि दोन वर्षांच्या मुलीसह मुंब्र्यातील जीवन बाग बुरहाणी इमारतीत राहत होता. त्याने दोन वर्षांपूर्वीत सदफ यांच्यासोबत प्रेमविवाह केला होता. पण गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये प्रचंड खटके उडत होते. त्यांच्या वारंवार भांडणं व्हायची. त्यांच्या 1 सप्टेंबरला असंच भांडण झालं होतं. याच भांडणानंतर आरोपी शाहनवाजने पत्नीला थेट संपवण्याचा कट आखला.

त्यासाठी त्याने पत्नीला आधी झोपेचं औषध दिलं होतं. त्यानंतर पत्नी बेशुद्ध झाल्यानंतर तिच्या तोंडात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा पाईप घातला. तिच्या देहाला ठिकठिकाणी जाळलं. त्यानंतर घराच्या दरवाज्याला लॉक लावून तो आपल्या दोन वर्षांच्या मुलीला घेऊन घराबाहेर पडला. पत्नीच्या हत्येनंतर तो त्याच्या उत्तर प्रदेश येथील गावी जाण्यासाठी निघाला. त्यासाठी तो एक्सप्रेसने निघाला होता.

पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं?

दुसरीकडे पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली होती. त्यांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयाच पाठवला होता. तसेच शाहनवाजचं मोबाईल लोकेशन ट्रेस केलं. विशेष म्हणजे पोलिसांना लोकेशन ट्रेस करण्यात यश आलं. त्याचं मध्यप्रदेशच्या इटारसी रेल्वे स्थानकात असल्याचं लोकेशन दिसत होतं. पोलिसांनी तातडीने इटारसी आरपीएफसोबत संपर्क साधत घटनेची माहिती दिली. तिथल्या आरपीएफने मोठ्या शिताफिने शाहनवाजला ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला मुंब्रा पोलीस ठाण्यात आणले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच त्याला न्यायालयात हजर केला असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा :

ब्रेकअपचं दुःख, मुंबईचा तरुण एक्स गर्लफ्रेण्डच्या गावात, उंच टेकडीवरुन जीव देणार तोच…

पुण्यात 13 वर्षीय मुलीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार, 8 जणांना बेड्या, महाराष्ट्राला हादरवणारी घटना

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.