AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिक्षा चालकावर धारदार शस्त्रानं सपासप वार करत हत्या! नवी मुंबईतील थरारक घटना, चौघांना अटक

Navi Mumbai Murder : धारदार शस्त्राच्या मदतीनं सपासप वार करत या तरुण रिक्षाचालकाचा जीव घेण्यात आला.

रिक्षा चालकावर धारदार शस्त्रानं सपासप वार करत हत्या! नवी मुंबईतील थरारक घटना, चौघांना अटक
धारदार शस्त्रानं वार करत हत्याImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 25, 2022 | 9:21 AM
Share

नवी मुंबई : नवी मुंबईत (Navi Mumbai) एका रिक्षा चालकाची हत्या (Rikshaw driver murder) करण्यात आली. धारदार शस्त्रानं वार करत ही हत्या करण्यात आली. ही थरारक घटना नवी मुंबईच्या गोवंडी (Gowandi murder) इथं घडली. गोवंडी स्थानकाच्या जवळच घडलेल्या या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. देवनार पोलिसांनी या हत्येप्रकरणी चौघांना अटकही केली आहे. सध्या पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास केला जातो आहे. धारदार शस्त्राच्या मदतीनं सपासप वार करत या तरुण रिक्षाचालकाचा जीव घेण्यात आला. भांडणाचा राग मनात ठेवून ही हत्या करण्यात आल्याचं संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गोवंडीमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेनं नवी मुंबईतील रिक्षा चालक व्यावसायिक हादरुन गेले आहेत. हत्या करण्यात आलेल्या रिक्षाचालक तरुणाचं नाव सलीम बेग असं आहे. सलीमचं वय 26 वर्ष होतं. शुक्रवारी त्याचं काही जणांसोबत भांडण झालं होतं. या भांडणाच्या रागातूनच त्याची हत्या झाली.

कधीची घटना?

तरुण रिक्षाचालक असलेल्या सलीमचा गोवंडी स्थानकाजवळच खून करण्यात आला. शनिवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारात ही हत्या करण्यात आली. दरम्यान, त्याआधी शुक्रवारी रिक्षाचालक सलीम बेगचं चार जणांचं भांडण झालं होतं. सकील शेख उर्फ खत्री, सद्दा खान उर्फ बैल, सिद्धांत घाडगे आणि सादिक मुल्ला या चौघांशी सलीमचा वाद झाला होता.

दरम्यान, सलिमसोबत शुक्रवारी झालेल्या वादाचा राग मनात ठेऊन या चौघांनी हे हत्याकांड केल्याचा संशय पोलिसांना असून त्या चौघांनाही अटक करण्यात आली आहे. धारदार शस्त्रानं वार करत सलीमचा खून करण्यात आला. ही घटना कळल्यानंतर सलीमचा भाऊन इरफान शेखनं पोलिसात धाव घेतली. देवनार पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन घेत हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.

अटक केलेल्या चार आरोपींची नावं पुढीलप्रमाणे –

सकीर शेख ऊर्फ खत्री, वय 29 सद्दाम खान ऊर्फ बैल, वय 22 सिद्धांत घाटगे, वय 22 सादित मुल्ला , वय 25

संबंधित बातम्या :

लग्न मोडल्यानं पोलिसाला नैराश्य? नागपुरातील तरुण पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या!

माता न तू वैरीणी ! साताऱ्यात जन्मदात्या आईनेच घेतला पाच महिन्याच्या मुलाचा जीव

आधी दारू पाजली, नंतर चाकूने वार करीत पेट्रोल ओतून पेटवून दिले! छत्तीसगडमधील खुनाची काही तासांत उकल

प्रेमाच्या त्रिकोणातून विटेने ठेचून तरुणाची हत्या; रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

पाहा मोठी बातमी : नागपूरमध्ये फर्निचरच्या दुकानाला आग

'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.