Chattisgarh Murder : आधी दारू पाजली, नंतर चाकूने वार करीत पेट्रोल ओतून पेटवून दिले! छत्तीसगडमधील खुनाची काही तासांत उकल

कावर्धा शहरातील भोजली तलावाजवळ शनिवारी सकाळी अर्धा जळालेला मृतदेह सापडला होता. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये खळबळ माजली होती. अखेर मृतदेहाची ओळख पटली आणि त्यानंतर पोलिसांनी काही तासांतच खुनाचे गूढ उकलले. रोहित सिन्हा असे मृत तरुणाचे नाव आहे. तो रामनगर येथील रहिवासी आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

Chattisgarh Murder : आधी दारू पाजली, नंतर चाकूने वार करीत पेट्रोल ओतून पेटवून दिले! छत्तीसगडमधील खुनाची काही तासांत उकल
संपत्तीच्या वादातून काकांनीच पुतण्याला 11 वेळा भोसकलेImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 1:27 AM

कावर्धा : छत्तीसगडमध्ये अल्पवयीन मुलाने आपल्या बहिणीच्या प्रियकरा (Boyfriend)चा काटा काढल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कावर्धा शहरात ही घटना घडल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. आरोपी अल्पवयीन मुलाने आधी बहिणीच्या प्रियकराला दारू पाजली, नंतर चाकूने वार करून अंगावर पेट्रोल ओतले व त्याला पेटवून दिले. त्यात तो तरुण गंभीररित्या होरपळला. तसेच चाकूच्या हल्ल्यात प्रचंड रक्तस्राव झाल्याने तरुणाची प्राणज्योत मालवली. हे धक्कादायक हत्या (Murder) प्रकरण निदर्शनास येताच पोलिसही चक्रावले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात दोन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. (In Chhattisgarh, a minor threw petrol on his sisters boyfriend and set him on fire)

आरोपीच्या मित्राने पुरावे लपवण्यास केली मदत

कावर्धा शहरातील भोजली तलावाजवळ शनिवारी सकाळी अर्धा जळालेला मृतदेह सापडला होता. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये खळबळ माजली होती. अखेर मृतदेहाची ओळख पटली आणि त्यानंतर पोलिसांनी काही तासांतच खुनाचे गूढ उकलले. रोहित सिन्हा असे मृत तरुणाचे नाव आहे. तो रामनगर येथील रहिवासी आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. रोहितच्या अनैतिक संबंधावरून त्याचा पत्नीशी वारंवार वाद होत असायचा. आरोपीच्या बहिणीशी रोहितचे अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले आहे. घटनेच्या दिवशी दोघेही तलावाजवळ बसून दारू प्यायले होते. यादरम्यान आरोपीने चाकूने रोहितचा गळा चिरला. त्यानंतर गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर पेट्रोल ओतून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. नंतर आरोपींनी मृत रोहितची सोनसाखळी, अंगठी, बुलेट घेऊन पळ काढला होता. या संपूर्ण प्रकरणात आरोपीच्या मित्राने पुरावे लपविण्यास मदत केली. त्यामुळे त्यालाही आरोपी करण्यात आले आहे.

मृत तरुणाच्या अनैतिक संबंधाचा पत्नीनेच केला पर्दाफाश

शनिवारी सकाळी शहरातील भोजली तलावाजवळ अर्धवट जळालेला मृतदेह असल्याची माहिती सर्वत्र पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक स्वत: घटनास्थळी पोहोचले. स्निफर डॉग, एफएसएल टीम, फोटोग्राफर आणि सायबर टीमला पाचारण करण्यात आले. पोलीस पथकाने कुटुंबीय व साक्षीदारांसमोर पंचनामा करण्याची कारवाई पूर्ण केली. पोलिस अधीक्षकांनी विशेष पथक तयार केले. याचदरम्यान मृत रोहितच्या पत्नीने रोहितच्या अनैतिक संबंधाचा पर्दाफाश केल्यामुळे पोलिसांना खुनाची उकल करण्यात मोठी मदत झाली. (In Chhattisgarh, a minor threw petrol on his sisters boyfriend and set him on fire)

इतर बातम्या

UP Murder : प्रेमाच्या त्रिकोणातून विटेने ठेचून तरुणाची हत्या; रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

Hariyana Crime : चालत्या ट्रेनमध्ये कबड्डीपटू मुलीवर अत्याचार; हरयाणातील धक्कादायक घटना

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.