बनावट नावे, बोगस ओटीपी, नेरुळमध्ये कोविशील्ड लसीचा काळाबाजार, 60 हजारांच्या व्हाईल्स जप्त

हर्षल भदाणे पाटील

| Edited By: |

Updated on: Aug 20, 2021 | 12:27 PM

बनावट ओटीपी क्रमांकाच्या मदतीने बेकायदा कोविशील्ड व्हॅक्सिनेशनचा काळाबाजार करणाऱ्या भामट्याला नेरुळमध्ये पोलिसांनी कारवाईचे 'इंजेक्शन' टोचले आहे. या आरोपीने लसीकरणाचा गोरखधंदा थाटला होता. याआधारे बनावट पद्धतीने लसीकरण सुरु होते. तब्बल 60 हजारांच्या कोविशील्डच्या व्हाईल्स पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

बनावट नावे, बोगस ओटीपी, नेरुळमध्ये कोविशील्ड लसीचा काळाबाजार, 60 हजारांच्या व्हाईल्स जप्त
Navi Mumbai Illegal Vaccination

Follow us on

नवी मुंबई : बनावट ओटीपी क्रमांकाच्या मदतीने बेकायदा कोविशील्ड व्हॅक्सिनेशनचा काळाबाजार करणाऱ्या भामट्याला नेरुळमध्ये पोलिसांनी कारवाईचे ‘इंजेक्शन’ टोचले आहे. या आरोपीने लसीकरणाचा गोरखधंदा थाटला होता. याआधारे बनावट पद्धतीने लसीकरण सुरु होते. तब्बल 60 हजारांच्या कोविशील्डच्या व्हाईल्स पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यामुळे गरजू सर्वसामान्यांच्या लसी बेकायदेशीर पद्धतीने व्हीआयपींना टोचल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कोरोना काळात सुरुवातीपासूनच रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार, बनावट आरटीपीसीआर रिपोर्ट बनवणारी टोळी शोधून काढणाऱ्या पनवेल गुन्हे शाखेच्या टीमने आता थेट कोव्हिशील्ड व्हॅक्सिनेशनचे डोस बेकायदा पद्धतीने देणाऱ्या व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. शेखर पाटील, उपायुक्त प्रवीण पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी किशोर खेत (21) याला नेरुळ येथून अटक केली.

औषध निरीक्षक अजय माहुले यांच्या टीमच्या मदतीने खेत याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून कोविशील्ड लसीच्या 60 हजार रुपये किमतीच्या दोन व्हाईस जप्त करण्यात आल्या. मूळचा राजस्थान येथील मारवाड भागातील रहिवासी असणारा आरोपी खेत हा बोगस पद्धतीने या लसींचा वापर करुन बेकायदेशीर लसीकरण रॅकेट चालवत होता.

मास्टरमाईंडचा शोध सुरु –

आधीच लसीकरणाचा साठा तुटपुंजा असताना आरोपी खेत याच्याकडे अशा पद्धतीने व्हाईल्स कुठून आल्या, त्याला या कोणी पुरवल्या, याआधीदेखील त्याने अशा पद्धतीने किती लोकांचे लसीकरण केले, या रॅकेटमागे मोठ्या टोळीचा हात आहे का, त्याचा मास्टरमाईंड कोण, या सर्व बाबींचा तपास सध्या नवी मुंबई पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या :

स्टेशनवर हिसका देऊन मोबाईल पळवला, पाठलाग करुन महिलेने चोरट्याला पकडलं

गुप्तांगात सोनं लपवून मुंबईत आणलं, तीन स्त्रियांना शिताफीने अटक, NCB ची धडक कारवाई

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI