नवी मुंबईतील मुजोर शाळा, 300 विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित, फीसाठी थेट पालकांना शाळेच्या आवारात कोंडलं

कोरोना काळात शाळेची फी वाढ न करण्याचा राज्य सरकारचा आदेश असताना अनेक शाळांकडून याला केराची टोपली दाखवली जात आहे (Navi Mumbai St Joseph School locked parents in school premises).

नवी मुंबईतील मुजोर शाळा, 300 विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित, फीसाठी थेट पालकांना शाळेच्या आवारात कोंडलं
प्रातिनिधिक फोटो

नवी मुंबई : कोरोना काळात शाळेची फी वाढ न करण्याचा राज्य सरकारचा आदेश असताना अनेक शाळांकडून याला केराची टोपली दाखवली जात आहे. नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ शाळेने तर फी न भरणाऱ्या 300 विद्यार्थ्यांना ॲानलाईन शिक्षणातून बाहेर काढल्याचा आरोप पालकांनी केलाय. याबाबत पालकांनी आज (26 जून) सकाळी 8 वाजता शाळेत जाऊन विचारपूस केली असता शाळा प्रशासनाकडून पालकांनाच शाळेच्या आवारात बंद करून ठेवले गेले. फीबाबत काही तो निर्णय घ्या आणि नंतरच शाळेच्या बाहेर जा, असा अजब पवित्रा शाळेने घेतला होता (Navi Mumbai St Joseph School locked parents in school premises).

नेमकं काय घडलं?

शाळेच्या मुख्य गेटलाच कुलूप लावल्याने शाळेत गेलेल्या पालकांना बाहेर जाता येत नव्हते. शाळेच्या या दादागिरी विरोधात काही पालकांनी गेटबाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हा सर्वप्रकार पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. पोलीसांनी शाळेत येऊन हस्तक्षेप करुन पालकांना बाहेर काढले. कोरोना काळात लोकांच्या नोकऱ्या गेल्या असताना शाळा फी वाढवत असल्याचा आरोप पालकवर्गाने केलाय. दरम्यान याबाबत आम्ही शाळेची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला (Navi Mumbai St Joseph School locked parents in school premises).

शाळा-पालक यांच्यात अनेक दिवसांपासून वाद

गेल्या कित्येक दिवसांपासून पनवेलमधील सेंट जोसेफ शाळेत पालक आणि शाळा प्रशासन यांच्यामध्ये फी बाबत वाद सुरू होता. पालकवर्ग नेहमी शाळेच्या गेटवर जाऊन शाळेत जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना आत येण्यासाठी मज्जाव केला जायचा, असा दावा पालकांनी केला आहे. आता तर शाळेने फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवण्यास सुरुवात केली आहे. याबाबत विचारणा करायला गेलेल्या पालकांना शाळेने शाळा परिसरात कोंडून ठेवलं. पालकसोबत शाळेतीळ मॅनेजमेंट चर्चा करायला तयार नसल्याची पालकांची तक्रार आहे.

पोलिसांची मध्यस्थी

खांडेश्वर पोलीस स्टेशनचे वपोनी देविदास सोनवणे यांनी या प्रकरणात मध्यस्थी करुन वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जे पालक फी भरण्यास असमर्थ आहेत त्यांच्याबाबत सर्वांशी चर्चा, विचार विनिमय करुन, योग्य तो मधला मार्ग काढावा, जेणेकरुन पालक आणि शाळा दोघं जिवंत राहतील, अशी सूचना दिली.

संबंधित बातमी :

नाशिकमध्ये वाढीव शाळा फीचा वाद पेटला, पालकांची आक्रमक भूमिका, पोलिसांची मध्यस्थी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI