AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sameer Wankhede | समीर वानखेडेंना मुदतवाढ, आणखी सहा महिने एनसीबीच्या विभागीय संचालकपदी

महाराष्ट्रात राहणारे समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती

Sameer Wankhede | समीर वानखेडेंना मुदतवाढ, आणखी सहा महिने एनसीबीच्या विभागीय संचालकपदी
Sameer Wankhede
| Edited By: Anish Bendre | Updated on: Oct 12, 2021 | 8:00 AM
Share

मुंबई : अंमली पदार्थ नियामक कक्षाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे एनसीबीच्या झोनल डिरेक्टरपदी वानखेडे पुढील सहा महिने कायम राहतील. 2 ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रुझ या जहाजावरील ड्रग्ज पार्टीवर घातलेल्या छाप्याचं त्यांनी नेतृत्व केलं होतं. यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह जवळपास 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कोण आहेत समीर वानखेडे?

महाराष्ट्रात राहणारे समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.

समीर वानखेडे हे ड्रग्जशी संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ज्ञ मानले जातात. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

कोणकोणत्या पदांवर काम

2008 ते 2021 पर्यंत त्यांनी एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) चे उपायुक्त, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अतिरिक्त एसपी, महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) संयुक्त आयुक्त आणि आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

वर्ल्डकप ट्रॉफीही अडवली

2013 मध्ये समीर वानखेडेंनी गायक मिका सिंगला परदेशी चलनासह मुंबई विमानतळावर पकडले होते. अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय आणि राम गोपाल वर्मा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मालमत्तांवर त्यांनी छापे टाकले आहेत. 2011 मध्ये सोन्याने मढवलेल्या क्रिकेट विश्वचषक ट्रॉफीला देखील कस्टम ड्यूटी भरल्यानंतरच मुंबई विमानतळावरून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली होती.

एनसीबीच्या चौकशीत समीर वानखेडे यांच्या एन्ट्रीमुळे बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे म्हटले जाते. बॉलिवूडमधील जे कलाकार ड्रग्ज घेतात किंवा मादक पदार्थांची खरेदी-विक्री करतात ते या क्षणी घाबरल्याची चर्चा आहे, याचे कारण समीर वानखेडे. डीआरआयमध्ये तैनात समीर वानखेडे यांना गेल्या वर्षी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये पाठवण्यात आले आहे. आता समीर मुंबईत उपस्थित असलेल्या एनसीबी टीमचा एक भाग आहेत, जी सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर उघडकीस आलेल्या ड्रग्ज अँगलचा तपास करत आहे.

अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती

इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे समीर वानखेडे एका मराठी अभिनेत्रीचे पती आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्याशी समीर वानखेडे यांनी 2017 मध्ये लगीनगाठ बांधली. त्यांना जुळी मुलंही आहेत. क्रांती रेडकर ‘कोंबडी पळाली’ गाण्यासह जत्रा, माझा नवरा तुझी बायको, फुल थ्री धमाल अशा अनेक सिनेमात झळकली आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO : धक्कादायक ! मुंबई पोलिसातील बडा अधिकारी एनसीबीच्या समीर वानखेडेंवर पाळत ठेवतोय?

कोण आहेत समीर वानखेडे ज्यांच्या रेडमध्ये शाहरुखच्या मुलासह बडे बडे सापडलेत?

RTPCR कोडवर्ड वापरुन क्रूझवर प्रवेश, पार्टी सुरु होताच छापा, समीर वानखेडेंची पुन्हा डॅशिंग कामगिरी

Follow Us
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती