नवी मुंबईत अवैध शस्त्रं आणि दारुगोळ्यावर कारवाई, 1 लाख 3 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी नवी मुंबईत अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या तरुण गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून देशीबनावटीचे दोन पिस्तूल व दोन जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली.

नवी मुंबईत अवैध शस्त्रं आणि दारुगोळ्यावर कारवाई, 1 लाख 3 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त


नवी मुंबई : पोलिसांनी नवी मुंबईत अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या तरुण गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून देशीबनावटीचे दोन पिस्तूल व दोन जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली. मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेने ही धडक कारवाई केली. बेकायदेशीर अग्निशस्त्रे व दारू गोळा खरेदी, विक्री बाबत गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती. मुसक्या आवळलेल्या आरोपींकडून एकूण लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी याबाबत माहिती दिली.

सापळा रचून पोलिसांनी दाखवली चतुराई

नवी मुंबई आयुक्तालयाच्य हद्दीत गुन्हे शाखेकडून अवैधरीत्या अग्निशस्त्रे व दारू गोळा बाळगणारे, खरेदी, विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे. मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार मेघनाथ पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत बेलपाडा बसस्टॉप जवळ (खारघर) मुंबई – पनवेल हायवे रोड या ठिकाणी अंदाजे 25 ते 30 वर्षे वयाचे दोन व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडे बेकायदेशीर अग्निशस्त्र व दारूगोळा असल्याचीही खात्रीशीर बातमी होती.

यानंतर मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी. कोल्हटकर यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे अधिकारी, अंमलदारासह बेलपाडा बसस्टॉप, खारघर याठिकाणी सापळा लावण्यात आला. यावेळी ओमनाथ सोलानाथ योगी (वय 23 वर्षे) आणि नंदलाल मेवालाल गुर्जर (वय 30 वर्षे) या दोघा तरुणांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतलं.

1 लाख 3 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त

आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे 2 देशी बनावटीचे पिस्तुल, 2 जिवंत काडतुसे व मोबाईल फोन इत्यादी एकूण 1 लाख 3 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्यांच्याविरूध्द खारघर पोलीस ठाणे गु.र.नं. 256/2021 भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 सह म.पो.का. कलम 37 (1), 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांना 11 जुलै रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

आरोपीकडे अग्निशस्त्रे मिळुन आल्याने त्यांचा बेकायदेशीर शस्त्रे बाळगण्याबाबतचा नेमका काय उद्देश होता. तसेच ते अग्निशस्त्रे कोठून आणले याबाबत सखोल तपास मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांचेकडून सुरू आहे. या उल्लेखनीय कामगिरीत मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एन. बी. कोल्हटकर, पोउपनि. प्रशांत ठाकुर, अंमलदार मेघनाथ पाटील, नितीन जगताप, विष्णु पवार, सचिन टिके, सतिश चव्हाण यांनी केलेली आहे.

हेही वाचा :

घरावर पेट्रोल टाकून कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, उल्हासनगर हादरलं

मिरजेत नशेबाज तरुणांचा हैदोस सुरुच, ऑईल टँकरची काच फोडली, वाहकाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

जमिनीचा वाद टोकाला, सख्ख्या भावाकडून दुसऱ्या भावाची हत्या, इंदापूर हादरलं

व्हिडीओ पाहा :

Police action on illegal weapons in Belpada bus stop Navi Mumbai

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI