नालासोपारा (पालघर) : विरारमध्ये आयसीआयसी बँकेत दरोडा पडण्याची घटना ताजी असताना आज (21 ऑगस्ट) नालासोपाऱ्यात एका ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. नालासोपाऱ्याच्या पश्चिमेला असणाऱ्या साक्षी ज्वेलर्समध्ये आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास दरोडा पडला. दोन चोरट्यांनी ज्वेलर्स लुटण्याच्या उद्देशाने ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश केला. यावेळी आरोपींनी ज्वेलर्स मालकाची हत्या केली. संबंधित घटनेचा थरार सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.