AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणपत गायकवाडांचे नाव घेऊ नको, अन्यथा तुझे बाबा सिद्दीकी करू…शिवसेना नेते महेश गायकवाड यांना धमकी

kalyan crime news: महेश गायकवाड हे अंबरनाथ येथील आनंदनगरमध्ये एका लग्नसमारंभात गेले होते. त्या ठिकाणी एका इसमाने ही चिठ्ठी त्यांना देत दिली. त्यात तुझे बाबा सिद्दीकी करू, असे लिहिले आहे.

गणपत गायकवाडांचे नाव घेऊ नको, अन्यथा तुझे बाबा सिद्दीकी करू...शिवसेना नेते महेश गायकवाड यांना धमकी
महेश गायकवाड यांना धमकीImage Credit source: TV 9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 10, 2025 | 6:44 PM
Share

kalyan crime news: उल्हासनगर पोलीस ठाण्यात भाजप माजी आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यात झालेला वाद देशभर चर्चेत आला होता. यावेळी गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते. या गोळीबार प्रकरणानंतर माजी आमदार गणपत गायकवाड सध्या कारागृहात आहेत. परंतु महेश गायकवाड यांनी धमकी मिळाली आहे. एका लग्नसमारंभात हे पत्र देवून धमकी देण्यात आली आहे.

काय आहे त्या चिठ्ठीत?

गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाड याचे नाव घेऊ नको नाही तर तुझे बाबा सिद्दीकी करू, अशी धमकी महेश गायकवाड यांना दिली आहे. एका पत्राद्वारे जीवे ठार मारण्याची ही धमकी मिळाली आहे. महेश गायकवाड हे अंबरनाथ येथील आनंदनगरमध्ये एका लग्नसमारंभात गेले होते. त्या ठिकाणी एका इसमाने ही चिठ्ठी त्यांना देत दिली. त्यात तुझे बाबा सिद्दीकी करू, असे लिहिले असल्याचे महेश गायकवाड यांनी म्हटले आहे. या प्रकरणी अंबरनाथमधील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ते पॉकीट कारागृहातील

महेश गायकवाड यांना लिहिलेल्या चिठ्ठीचा कागद आणि पॉकीट जेलमधील आहे. तो गणपत गायकवाड यांनीच पाठवल्याचा संशय महेश गायकवाड यांनी व्यक्त केला. गणपत गायकवाड पंधरा दिवस कारागृहात तर पंधरा दिवस जे.जे. रुग्णालयात असतात. त्यामुळे गणपत गायकवाड कारागृहातील कैद इतर आरोपीसारखे काढत नाही. त्याच्यावर अनेक आका लोकांचा हात आहे. त्यामुळे त्याची मजा चालली आहे. तसेच वैभव गायकवाड याला क्लिन चिट दिली आहे. या प्रकरणात आपण सीबीआय चौकशीची मागणी करत आहे. त्यासाठी उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याची महेश गायकवाड यांनी म्हटले. माझ्यावर गोळीबार झाला. त्या वेळेला कुठलीही गाडी जप्त केली नाही. अनेक पुरावे नष्ट केले. तालुक्यामध्ये झालेले फरार आरोपी देखील पोलीस एक वर्षापर्यंत पकडले नाही, असे गायकवाड यांनी म्हटले.

धमक्यांना घाबरत नाही, पण…

मी अशा धमक्यांना घाबरत नाही. मरणाला देखील घाबरत नाही. मात्र, आमचे घरचे नातेवाईक हे चिंतेत आहेत. अनेक जण फोन करत आहेत. अनेक जण भेटायला येत आहेत. यासाठी ही लढाई मी शेवटपर्यंत लढणार असल्याचे महेश गायकवाड यांनी म्हटले.

दरम्यान यापूर्वी महेश गायवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन गणपत गायकवाड यांच्याबाबत अनेक आरोप केले होते. त्यांनी म्हटले होते की, आरोपी माजी आमदार गणपत गायकवाड हे तळोजा जेलला आहे. गणपत गायकवाड यांना चेकअपच्या नावाखाली जे. जे. रुग्णालयात आणले जाते. त्यानंतर त्यांना मुंबई फिरवले जाते, असा गौप्यस्फोट महेश गायकवाड यांनी केला होता.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?