Kalyan Crime | बारबालेवर जीव जडला म्हणून आपल्या गुन्हेगार मित्रासोबत नको ते कृत्य, ‘त्याने’ तिच्यावर लाखो उधळले

कल्याण डोंबिवलीत घरफोडीच्या घटनांनी अक्षरश: टोक गाठलं होतं. सातत्याने वाढलेल्या या घटनांमुळे पोलिसांची देखील डोकेदुखी वाढली होती. त्यामुळे पोलिसांकडून कसून तपास सुरु होता. या तपासादरम्यान पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Kalyan Crime | बारबालेवर जीव जडला म्हणून आपल्या गुन्हेगार मित्रासोबत नको ते कृत्य, 'त्याने' तिच्यावर लाखो उधळले
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 9:37 PM

मुंबई | 8 ऑगस्ट 2023 : प्रेम करणं यात काहीच वाईट नाही. प्रेम ही खूप सुंदर भावना आहे. पण प्रेमात आणि मोहात अडकून काय करावं? याबाबत आपण नक्कीच विचार करायला हवा. प्रेमात समर्पण असतं, त्याग असतो. विशेष म्हणजे आदर असतो. पण या गोष्टी काही व्यक्तींसाठी अपवाद असू शकतात. त्यातलाच एक व्यक्ती म्हणजे कल्याण डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी पकडलेला युसूफ शेख. युसूफ यांची प्रेम कहाणी अतिशय विचित्र आहे. तो एका बारबालेच्या प्रेमात पडला आणि तिला इम्प्रेस करण्यासाठी नको त्या उद्योगाला लागला.

मुंबईतील डान्सबारमधील एका बारबालेवर जीव जडला म्हणून युसूफ शेख याने आपल्या गुन्हेगार मित्रासोबत तीन महिन्यात 18 घरफोडी केल्याचे उघड झालंय. त्याने आपल्या एका गुन्हेगार मित्राच्या मदतीने चोऱ्या केल्या आणि बारबालेवर सर्व पैसे उधळले. मानपाडा पोलिसांच्या तपासात याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. डोंबिवली मानपाडा पोलिसांनी सापळा रचत सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

युसूफ शेख, नौशाद आलम अशी या दोन्ही सराईत चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी या दोघांकडून 20 तोळे सोन्याचे दागिने, सव्वा 2 लाखांची रोकड, दोन बाईक, 2 लॅपटॉप, 8 मोबाईल, पाच महागडी घड्याळ, 1 महागडा कॅमेरा, स्क्रू ड्रायव्हर, चाकू, पक्कड हस्तगत केली आहेत.

पोलिसांनी ‘असा’ केला तपास

कल्याण डोंबिवली परिसरात घरफोडीचे प्रकार वाढले होते. या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ आणि एससीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरिक्षक मदने, पोलीस अधिकारी सनिल तारमळे, अविनाश वनवे आणि प्रशांत आंधळे या तीन पोलीस अधिकाऱ्यांचं पथक नेमण्यात आलं होतं. हे पथक चोरी, लूट, स्नॅचिंग सारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी काम करत होतं.

या पथकाने डोंबिवली परिसरातील घरफोडी झालेल्या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहिले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने आणि गुप्त बतमीदाराच्या मदतीने नवी मुंबईतील घणसोली परिसरात राहणारा युसूफ शेख आणि त्याचा मित्र नौशाद या दोघांना अटक केली. पोलिसांनी या दोघांची चौकशी करत 18 गुन्हे उघड केले. आरोपींकडून मोठ्या प्रमाणात दागिने, पैसे, लॅपटॉप, मोबाईल इतर साहित्य जप्त करण्यात आले.

आरोपीने पोलिसांना चोरीचे कारण सांगितले

विशेष म्हणजे पोलिसांनी आरोपींना चोरी कशासाठी करायचे? हे विचारले असता त्याचं उत्तर ऐकून पोलिसही चक्रावले. यातील एक आरोपी युसूफ हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर 23 चोरीचे गुन्हे आहेत. तो आपल्या मित्रासोबत मुंबईतील एका डान्सबार गेला. तिथे त्याचा जीव डान्सबारमध्ये काम करणाऱ्या बारबालेवर जडला. तिला खूश करण्यासाठी यूसूफने आपला सराईत मित्र नौशाद आलमसोबत चोऱ्या केल्या.

50 लाखांपेक्षा जास्त पैसे बारबालावर उधळले

आरोपी बंद घरांची रेकी करायचे. ते दिवसा रेकी करायचे आणि रात्री त्या घरांची घरफोडी करायचे. त्यानंतर आरोपी चोरी केलेले पैसे बारबालेवर उधळायचा. त्याने आतापर्यंत असे 50 लाखांपेक्षा जास्त पैसे त्या बारबालेवर उधळले आहेत. सध्या पोलिसांनी या दोघांकडून 20 तोळे सोन्याचे दागिने, सव्वा दोन लाखांची रोकड, दोन बाईक, 2 लॅपटॉप, 8 मोबाईल, 5 महागडी घड्याळ, 1 महागडा कॅमेरा, स्क्रू ड्रायव्हर, चाकू, पक्कड हस्तगत करत पुढील तपास सुरू केला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.