AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील भाविकांनी भरलेली बोलेरो कार उत्तराखंडच्या दरीत कोसळली! 3 ठार, 10 गंभीर जखमी

Uttarakhand Accident : समोरुन येणाऱ्या बसला साईड देण्यासाठी कार चालकानं गाडी रिव्हर्स घेतली. त्याचवेळी गाडीवरीन नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट दरीतच कोसळली.

महाराष्ट्रातील भाविकांनी भरलेली बोलेरो कार उत्तराखंडच्या दरीत कोसळली! 3 ठार, 10 गंभीर जखमी
भीषण अपघातात तिघांचा मृत्यूImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 27, 2022 | 2:39 PM
Share

मुंबई : गुरुवारी उत्तराखंडमध्ये भाविकांच्या बोलेरो (Bolero Car Accident) गाडीचा भीषण अपघात झाला. बोलेरो कार दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू (Three Devotees killed) झाला अशून इतर दहा जण गंभीर जखमी झाले आहे. उत्तरकाशीमध्ये यमुनोत्रीच्या मार्गावर असताना हा भीषण अपघात घडला. या अपघातामधील मृतांमध्ये महाराष्ट्राच्या मुंबई आणि भंडारा जिल्ह्यातील भाविकांचा समावेश आहे. गुरुवारी रात्री उशीरा अपघाताची ही घटना घडली. यमुनोत्रीच्या धामपासून 28 किलोमीटर दूर बोलेरो (Mahindra Bolero) कारचा भीषण अपघात झाला. ओजरीजवळ झालेल्या या अपघातामुळे तिघे जागीच गतप्राण झालेत. तर गंभीर जखमी झालेल्यांवर उपचार सुरु आहेत.

मृतांची नावं काय आहेत?

अशोक महादेव राव, वय 40, नागपूर पुरण नाथ, वय 40, अंधेरी पूर्व, मुंबई जयश्री अनिल कोसरे, 26, तुमसर, भंडारा जिल्हा

साईड देण्याच्या नादात थेट दरीत

घाट रस्त्यावरील एका तीव्र वळणावर हा भीषण अपघात झाला. समोरुन येणाऱ्या बसला साईड देण्यासाठी कार चालकानं गाडी रिव्हर्स घेतली. त्याचवेळी गाडीवरीन नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट दरीतच कोसळली. मागे जाऊन कार थेट दरीत कोसळल्यानं रात्रीच्यावेळी एक गोंधळ उडाला होता.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तातडीनं पोलीस आणि बचावयंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर जखमींना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं होतं.

पाहा व्हिडीओ : पालघरमध्ये भीषण अपघात

एकूण दहा जण अपघातातमध्ये जखमी झालेत. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातामध्ये बचावलेल्या दहा जणांना लहान मुलं आणि तरुणांचा समावेश आहेत.

अपघातातून वाचलेल्यांची नावं

कृषिता, वय 15 रचना, वय 38 मोनिका, वय 24 दिनेश, वय 35 लक्ष्मी, वय 46 बाळकृष्ण जीटू, वय 41 प्रमोद तुलसी, वय 52 प्रेरणा, वय 8 बोदी, वय 10 अंजू अशोक राव, वय 4

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.