कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार, लाकडी रॉडने मारहाण, मोबाईल हिसकावला, पैसे लुटले आणि…

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण रेल्वे स्थानकाजवळ रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास तीन जणांनी मिळून एका प्रवाशाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार, लाकडी रॉडने मारहाण, मोबाईल हिसकावला, पैसे लुटले आणि...
Follow us
| Updated on: Mar 04, 2024 | 7:22 PM

सुनील जाधव, Tv9 प्रतिनिधी, कल्याण | 4 मार्च 2024 : कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रात्री दोन वाजेच्या सुमारास एका प्रवाशाला अडवून त्याला बेदम मारहाण आणि लुटणाऱ्या एका आरोपीला बेड्या ठोकण्यात कल्याणच्या महात्मा पोलिसांना मोठं यश आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात लुटमारीच्या घटना सातत्याने समोर येत होत्या. रात्रीच्या वेळी चाकू दाखवून प्रवाशांना दमदाटी करुन लुटणाऱ्या घटनांची कल्याणमध्ये वारंवार चर्चा सुरु होती. अखेर अशाच एका प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आरोपींवर अतिशय कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी. विशेष म्हणजे त्याच्या इतर सहकाऱ्यांनादेखील अटक करण्यात यावी आणि त्यांना पोलिसी खाक्या दाखवून वठवणीवर आणण्यात यावं, अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे.

नाशिकवरून मुंबईला देवदर्शनासाठी आलेल्या एका व्यक्तीला कल्याण स्टेशन बाहेर तीन जणांनी मिळून बेदम मारहाण केली. आरोपींनी त्याच्या खिशातील मोबाईल आणि तीन हजार रुपये काढून घेतले. आरोपी प्रवाशाला लुटून पळून गेले. याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर कल्याण महात्मा फुले पोलिसांनी अवघ्या पाच तासात एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल आणि लुटलेली रक्कम जप्त केली आहे. तर इतर दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भालचंद्र मथुरे असं फर्यादीचं नाव आहे. तो नाशिकवरून मुंबईला देवदर्शनासाठी आला होता. तो देवदर्शन झाल्यानंतर आपल्या परतीच्या प्रवासासाठी भिवंडीतील कोनगाववरून रात्री दोन ते अडीचच्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशनवर उतरला. त्या ठिकाणी आरोपी हर्षल कदम आणि त्याच्या दोन साथीदारांनी भालचंद्र मथुरेला स्टेशनच्या बाहेर अडवत त्याला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. आरोपींनी त्याच्या खिशातील महागडा मोबाईल आणि तीन हजार रुपयेपर्यंतची कॅश घेऊन ते तिघे लंपास झाले.

मात्र याप्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात फिर्यादीने तक्रार दाखल करतात पोलीस ॲक्शन मोडवर आले. पोलिसांनी अवघ्या पाच तासांच्या आत या तिघांपैकी एकाला म्हणजेच हर्षलला गुप्त बातमीदारांच्या मदतीने बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे. तर त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.