AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai : आधी 35 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण; नंतर अल्पवयीन मुलाची हत्या, दोन आरोपींना अटक

मीरारोड परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. खंडणीसाठी (Extortion) अपहरण करण्यात आलेल्या 14 वर्षीय मुलाची हत्या (murder) करण्यात आली आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

Mumbai : आधी 35 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण; नंतर अल्पवयीन मुलाची हत्या, दोन आरोपींना अटक
दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून नातवाने आजोबांना संपवलेImage Credit source: tv9
| Updated on: Aug 03, 2022 | 1:35 PM
Share

मुंबई : मीरारोड परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. खंडणीसाठी (Extortion) अपहरण करण्यात आलेल्या 14 वर्षीय मुलाची हत्या (murder) करण्यात आली आहे. या प्रकाराने खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. हत्या करण्यात आलेला मुलगा हा दोन दिवसांपूर्वी आपल्या घरातून बेपत्ता झाला होता. या प्रकरणी त्याच्या कुटुंबीयांनी काश्मिरा पोलीस (Police) ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. मात्र आता त्याची त्यानंतर हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांनी खूनाची कबुली देखील दिली आहे. अफजल आणि इरफान असे या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ओळखीचा फायदा घेत आरोपींनी या मुलाचे अपहरण केले. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली.

आरोपींकडून हत्येची कबुली

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित अल्पवयीन मुलगा त्याच्या घरातून दोन दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाला होता. या प्रकरणी आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी काश्मिरा पोलीस ठाण्यात  दिली होती. त्यानंतर अपहरण झालेल्या मुलाच्या आईकडे फोनवरून 35 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. मात्र त्यानंतर आरोपींनी त्याची हत्या केली. पोलिसांनी तपासाची सुत्रे गतिमान करत फोन कॉलच्या आधारे आरोपींच्या मुसक्या आवळल्या. अफजल आणि इरफान  असे या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.  नायगावमध्ये या मुलाची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

ओळखीचा फायदा घेऊन अपहरण

सबंधित मुलाच्या  नातेवाईकाचे शांती पार्क येथील रॉयल पॅलेस इमारतीमध्ये घर होते. त्या ठिकाणी तो कधीकधी येत असे.  यातूनच त्याची आरोपींशी एक महिन्यापूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर आरोपींनी या मुलाचे अपहरण करून  खंडणी वसूल करण्याचा प्लॅन आखला. त्यांनी या मुलाला आपल्या गाडीत बसून नायगावला नेले. मात्र त्यानंतर तो हे सर्व आपल्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना सांगेल या भीतीतून आरोपींनी त्याची हत्या केली. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.