Ulhasnagar crime : घर दुरुस्तीसाठी 30 हजाराची लाच मागणं भोवलं! पालिकेच्या अधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा, तिघांपैकी दोघांना रंगेहाथ अटक

उल्हासनगर प्रभाग समिती 4 अंतर्गत राहणाऱ्या एका नागरिकाचं जुनं घर मोडकळीला आलं होतं. त्यामुळे त्याने हे घर दुरुस्त करून पुन्हा बांधायला घेतलं. यावेळी मुकादम रतन जाधव याने या नागरिकाकडून 30 हजारांची लाच मागितली, असा आरोप केला होता.

Ulhasnagar crime : घर दुरुस्तीसाठी 30 हजाराची लाच मागणं भोवलं! पालिकेच्या अधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा, तिघांपैकी दोघांना रंगेहाथ अटक
टिटवाळ्यात महिलेला मारहाणImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 10:58 AM

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar crime) एन्टी करप्शन विभागाने (Anti Corruption burao) मोठी कारवाई केली आहे. लाच मागणाऱ्या तिघांजणांवर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून एक जण भरार आहेत. विशेष म्हणजे मोठ्या अधिकाऱ्यांनीच (Municipality officers) लाच मागितल्यामुळे उल्हानगर पालिकेत खळबळ उडाली आहे. शिवाय एन्टी करप्शनने केलेल्या कारवाईमुळे पालिकेत लाच मागणाऱ्या इतर अधिकाऱ्यांचंही धाबं दणाणलं आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांसह एकूण ३ कर्मचाऱ्यांवर अँटी करप्शन विभागानं गुन्हा दाखल केलाय. एकूण 30 हजार रुपयांची लाच या तिघांकडून मागण्यात आली होती. मोडकळीला आलेलं घर दुरुस्त करणाऱ्या नागरिकाकडे पालिकेतील लोकांनी लाच मागितली होती. नागरिकाकडून ३० हजारांची लाच मागितल्याचा ठपका ठेवत तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात सहाय्यक आयुक्तांसह इतर दोघांचाही समावेश आहे.

उल्हासनगर प्रभाग समिती 4 अंतर्गत राहणाऱ्या एका नागरिकाचं जुनं घर मोडकळीला आलं होतं. त्यामुळे त्याने हे घर दुरुस्त करून पुन्हा बांधायला घेतलं. यावेळी मुकादम रतन जाधव याने या नागरिकाकडून 30 हजारांची लाच मागितली, असा आरोप केला होता.

हे सुद्धा वाचा

पाहा Live घडामोडी :

सहाय्यक आयुक्त महेंद्र पंजाबी यांना देण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती. तडजोडीअंती 25 हजार रुपये देण्याचं ठरल्यानंतर रतन जाधव याने सफाई कामगार विजय तेजी याला ही रक्कम स्वीकारायला पाठवलं. यावेळी ठाणे अँटी करप्शन विभागाने सापळा रचून विजय तेजी आणि मुकादम रतन जाधव यांना रंगेहाथ अटक केली. तर ट्रॅप लागल्याची कुणकुण लागताच सहाय्यक आयुक्त महेंद्र पंजाबी हा फरार झाला.

लाच घेतल्याप्रकरणी या तिघांवरही हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पंजाबी याचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे पालिकेतील अधिकारी सर्रास लाच घेत असल्याचंही धक्कादायक वास्तव उघडकीस आलं आहे. एन्टी करप्शनने केलेल्या कारवाईमुळे आता लाचखोरांना दणका बसलाय. दरम्यान, पंजाबी यांना अटक कधी होते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.