Video : उल्हासनगरमध्ये रिक्षावाल्याला गटारीची झिंग, एक्टिवाला धडकला आणि मग बघा काय केलं?

उल्हासनगरच्या कॅम्प 3 ओटी सेक्शनमधील गणेशनगर परिसरात बुधवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.

Video : उल्हासनगरमध्ये रिक्षावाल्याला गटारीची झिंग, एक्टिवाला धडकला आणि मग बघा काय केलं?
निनाद करमरकर

| Edited By: सिद्धेश सावंत

Jul 28, 2022 | 1:06 PM

ठाणे : बुधवारी अनेकांनी जोरदार गटारी साजरी केली. या गटारीनंतर झिंगलेल्या एका रिक्षा चालकाचा (Ulhasnagar Rikshaw Driver Video) व्हिडीओ समोर आला आहे. उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar Crime News) एका रिक्षा चालकानं चुकीच्या लेनमध्ये गाडी रिक्षा चालवली. ओव्हरटेक करण्याच्या नादात कट मारण्याचा प्रयत्न रिक्षा चालकानं केला. त्यानंतर रिक्षा चालकाने पुढे जाऊन रिक्षा एका बाजूला लावली. पार्क केली. मग तो खाली उतरला. मागे एक्टिव्हा वाल्याजवळ (Honda Activa) चालत आता. तोपर्यंत रस्त्यावर पडलेली एक्टीव्हावरील व्यक्ती पुन्हा उठून उभी राहिली. आता मारामारी होते की काय, अशी भीती उपस्थितांमध्ये निर्माण झाली. पण चक्क रिक्षावाल्याने एक्टिवा वाल्याला दमदाटी केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. अखेर बाचाबाचीवेळी लोकं जमली. गर्दी झाली. यानंतर घाबरलेल्या रिक्षा वाल्यानं सुमडीत तिथून पळ काढला. या सगळ्या प्रकरणाची माहिती पोलिसांनाही देण्यात आली आहे. पण अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आल्याचं वृत्त समोर आलेलं नाही.

पाहा व्हिडीओ :

उल्हासनगरच्या कॅम्प 3 ओटी सेक्शनमधील गणेशनगर परिसरात बुधवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. या भागात रस्त्यावरून वाहनं आपापल्या मार्गानं जात असताना अचानक एक रिक्षाचालक भरधाव वेगात राँग साईडने आला. त्याने समोरून येणाऱ्या ऍक्टिव्हा चालकाला धडक देत खाली पाडलं.

यानंतर रिक्षाचालकाने उतरून येत ऍक्टिव्हा चालक आणि त्याच्यासोबत तिथे असलेल्या इतर वाहनचालकांना दमदाटी केली आणि तिथून पळ काढला. हा सगळा प्रकार तिथल्या सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे कैद झाला. यावेळी दुचाकीस्वार आणि रिक्षा वाल्यामध्ये हमरीतुमरी झाली. इतरत लोकंही यावेळी जमली. त्यांनीही रिक्षावाल्याला सवाल केला.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, रिक्षावाला पुढेही आला आणि रस्त्यावर पडलेली दुचारीही उचलून देण्यासाठी त्याने मदत केली. पण नंतर मात्र तो तिथून निघून गेला. या व्हिडीओमध्ये रिक्षा चालक दारु पिऊन झिंगलेल्या अवस्थेत होता, असं स्पष्टपणे दिसून आलंय. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिकांनी उल्हासनगरच्या वाहतूक पोलीस आणि मध्यवर्ती पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज आणि रिक्षेचा फोटो पाठवून तक्रार केली. आता या रिक्षा चालकावर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें