व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील वाद, भाजप आमदाराच्या पीएची गाडी फोडली, उल्हासनगरच्या व्यावसायिकाने आरोप फेटाळले

उल्हासनगरचे भाजपचे आमदार कुमार आयलानी (Kumar Ailani) यांचे पीए प्रकाश तलरेजा यांची गाडी काही अज्ञातांनी फोडल्याची घटना घडली आहे

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील वाद, भाजप आमदाराच्या पीएची गाडी फोडली, उल्हासनगरच्या व्यावसायिकाने आरोप फेटाळले
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील वाद, भाजप आमदाराच्या पीएची गाडी फोडली, उल्हासनगरच्या व्यावसायिकाने आरोप फेटाळले

उल्हासनगर : उल्हासनगरचे भाजपचे आमदार कुमार आयलानी (Kumar Ailani) यांचे पीए प्रकाश तलरेजा यांची गाडी काही अज्ञातांनी फोडल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून यामागे उल्हासनगरमधील व्यावसायिक राम वाधवा यांचा हात असल्याचा आरोप तलरेजा यांनी केला आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच गाडीच्या तोडफोडीचा सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

नेमकं काय घडलं?

राम वाधवा हे उल्हासनगरमधील बांधकाम व्यावसायिक असून ते पूर्वी भाजपचे प्रवक्ते म्हणून कार्यरत होते. मात्र नंतर त्यांच्यात आणि भाजपचे आमदार कुमार आयलानी यांच्यात वितुष्ट निर्माण झालं. त्यातच उल्हासनगरमधील एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर प्रकाश तलरेजा यांनी टाकलेल्या पोस्टवरुन राम वाधवा आणि प्रकाश तलरेजा यांच्यात वादविवाद झाले.

अज्ञातांनी तलरेजा यांची गाडी फोडली

या घटनेनंतर काही वेळाने प्रकाश तलरेजा यांची गाडी त्यांच्या घराखाली उभी असताना अज्ञाता तिथे आले. त्यांनी तलरेजा यांच्या गाडीची मागची काच फोडली आणि पोबारा केला. त्यामुळे हा प्रकार राम वाधवा यांनीच केल्याचा आरोप प्रकाश यांनी केला आहे.

तलरेजा यांची पोलीस ठाण्यात तक्रार

याप्रकरणी प्रकाश तलरेजा यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा सुद्धा नोंदवला आहे. तर याबाबत राम वाधवा विचारलं असता प्रकाश तलरेजा हे शहरातील ब्लॅकमेलर असून त्यांची गाडी मी फोडलेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

हेही वाचा :

वाहन चोरी प्रकरणातील संशयित आरोपीचा भर रस्त्यावर हैदोस, पोलिसाला मारहाण करत चावा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI