वाहन चोरी प्रकरणातील संशयित आरोपीचा भर रस्त्यावर हैदोस, पोलिसाला मारहाण करत चावा

वाहन चोरी प्रकरणात संशयित असलेल्या दाम्पत्याला चौकशीसाठी कार्यालयात घेऊन जात असताना या दाम्पत्याने पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) एका कर्मचाऱ्याला मारहाण करत त्याच्या हाताला चावा घेतल्याचा प्रकार घडला आहे

वाहन चोरी प्रकरणातील संशयित आरोपीचा भर रस्त्यावर हैदोस, पोलिसाला मारहाण करत चावा
वाहन चोरी प्रकरणातील संशयित आरोपीचा हैदोस, पोलिसाला मारहाण करत चावा

पुणे : वाहन चोरी प्रकरणात संशयित असलेल्या दाम्पत्याला चौकशीसाठी कार्यालयात घेऊन जात असताना या दाम्पत्याने पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) एका कर्मचाऱ्याला मारहाण करत त्याच्या हाताला चावा घेतल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी उद्धव एकनाथ भोसले (वय 35) याला अटक करण्यात आली आहे. तर पत्नीला हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत पोलीस कर्मचारी सचिन पवार हे जखमी झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन पवार पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) युनिट सहामध्ये नेमणुकीस आहेत. युनिट सहाचे पथक वाहन चोरीचा तपास करत होते. यादरम्यान त्यांना रविवारी (11 जुलै) उद्धव भोसले आणि त्याची पत्नी एक संशयित दुचाकी घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्यांना अडविले.

आरोपींकडून पोलिसांना धक्काबुक्की

सचिन पवार हे त्यांना संशयित म्हणून काल (रविवार, दि. 11 जुलै) सकाळी गाडीतून कार्यालयात घेऊन जात होते. यावेळी दोघांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करत त्यांना धक्काबुक्की केली. तसेच, त्यांना शिवीगाळ केली. तर उद्धव याच्या पत्नीने त्यांच्या हातातील फळीने वाहतूक वॉर्डनला मारहाण केली. तसेच, उद्धव याने फिर्यादी यांच्या हाताचा मनगटाचा चावा घेऊन त्यांना जखमी केले, असे पोलीस सचिन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपीला अटक

पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करत उद्धव याला अटक केली आहे. दरम्यान, दाम्पत्याकडे असलेली दुचाकीची क्रमांक प्लेट ही दुसरीच आहे. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांना पकडले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत (Policeman beaten up by suspected accused in vehicle theft case in Pune).

संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :

हेही वाचा : पुण्यात एकाच दिवशी दोन कुख्यात गुंडांच्या हत्या, एकावर गोळीबार, दुसऱ्यावर कोयत्याने वार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI