Vasai: वसई दुर्घटनेत मायलेक वाचले, पण बापलेक ठार! अखेर फरार विकासकाला कांदिवलीतून अटक

Vasai Landslide Update News :वसईतील राजवलीच्या वाघरल पाडा या परिसरात बुधवारी सकाळी दरड कोसळली.

Vasai: वसई दुर्घटनेत मायलेक वाचले, पण बापलेक ठार! अखेर फरार विकासकाला कांदिवलीतून अटक
अखेर विकासकाला अटक..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 2:41 PM

मुंबई : वसई दरड दुर्घटनेप्रकरणी (Vasai Land Slide News) अखेर विकासकाला अटक करण्यात आलं आहे. या विकासकासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसई दरड दुर्घनटेमध्ये दोघा जणांचा जीव गेला होता. बुधवारी घडलेल्या या घटनेनंतर गुरुवारी रात्री याप्रकरणी अटकेची कारवाई करण्यात आली आहे. विकासक अजित सिंह याला कांदिवलीतून पोलिसांनी (Kandivali Police) ताब्यात घेतलं आहे. एकाच कुटुंबातील दोघांनी वसई दरड दुर्घटनेत जीव गमावला होता. दोन एफआयआर याप्रकरणी दाखल करण्यात आले होते. एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता जमीन मालकासह या दुर्घटनेचा जबाबदार असल्याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला होता. मुसळधार पावसामध्ये (Vasai Rain Update News) घरावर दरड कोसळून एकाच कुटुंबातील चौघे जण दरडीखाली अडकले गेले होते. त्यापैकी दोघांना वाचवण्यात यश आलं. तर अमित ठाकूर या 35 वर्षीय व्यक्तीसह त्याच्या मुलीचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला होता. तर दोघे जण थोडक्यात या दुर्घटनेतून वाचले होते. पण तेही जखमी झाले होते.

गुरुवारी अटक

अजित सिंह हा मितवा रिऍलिटीचा मालक आहे. वसई दरड दुर्घटनेनंतर तो गुजरातच्या वापीमध्ये पळाला होता. क्राईम ब्रांच पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. अखेर क्राईम ब्रांच पोलिसांनी अजित याला कांदिवलीतून बेड्या ठोकल्या. गुरुवारी रात्री त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

वसईतील राजवलीच्या वाघरल पाडा या परिसरात बुधवारी सकाळी दरड कोसळली. दरड कोसळून 4 जण त्यात अडकले होते. एका घरावर ही दरड कोसळली होती. यामध्ये चार पैकी दोघांना वाचवण्यात आलं, तर दोघे जण मृत्युमुखी पडले होते. या प्रकरणी अजित सिंह आणि जमीन मालक मेरी ग्रेशियस यांच्याविरुद्ध आयपीसी कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. सिंग यांनी सात वर्षांपूर्वी ग्रेशियसकडून भूखंड खरेदी केलेला होता. एकता वेल्फेअर सोसायटीची चाळ त्यांनी बांधली होती. ज्या ठिकाणी भूस्खलन झालं, तो खासगी भूखंड असल्याचीही माहिती समोर आली होती.

बेकायदेशीर चाळींचा काळाबाजार

या भागात दोन हजार बेकायदेशीर चाळी असून या चाळींमध्ये तीन ते चार लाखात घरं रातोरात विकली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. दरड कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर आता या प्रकरणी गंभीर पावलं प्रशासनाकडून उचलली जाण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. दोन एफआयआरपैकी एक एफआयआर शैलेश निशाद, रत्नेश पांडे आणि अनिल दुबे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आल आहे. तर एका अज्ञाताविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून हे सर्व जण सध्या फरार आहे. त्यांच्या शोध पोलिसांकडून घेतला जाते आहे.

वसईतील दरड दुर्घटनेनंतर पोलिसांनी याप्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना सहा रुपये प्रत्येक मदत जाहीर केली आहे. आता मृत अमित ठाकूर यांची पत्नी वंदना ठाकूर आणि त्यांचा 10 वर्षांचा मुलगा ओम यांच्या घरावरील छत्र हरवलंय. या दोघांनीही या दुर्घटने किरकोळ मारला असला तरी त्यांच्या मनावर मोठा आघात झालाय.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.