जिममध्ये भेट, तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, लग्नाचं आमिष ते अश्लील व्हिडीओ, मुंबईच्या माहिममधील धक्कादायक प्रकार

मुंबईच्या माहिम पोलीस ठाणे हद्दीत एक भयानक आणि विचित्र घटना समोर आली आहे.

जिममध्ये भेट, तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, लग्नाचं आमिष ते अश्लील व्हिडीओ, मुंबईच्या माहिममधील धक्कादायक प्रकार
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : मुंबईच्या माहिम पोलीस ठाणे हद्दीत एक भयानक आणि विचित्र घटना समोर आली आहे. एका नराधमाने 26 वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. त्यानंतर लग्नाचं आमिष दाखवलं. पण आरोपीचं आधीच लग्न झालेलं होतं. ही बाबत तरुणीला माहिती पडली तेव्हा तिला धक्काच बसला. तिने आरोपीला विरोध केला तेव्हा त्याने अश्लील व्हिडीओ बनवला. नंतर संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी दाखवत 12 तोळे सोने आणि पैसे उकळले. तो तरुणीला वारंवार त्रास देऊन पैशांची मागणी करत होता. अखेर त्याच्या जाचाला कंटाळून तरुणीने माहिम पोलीस ठाण्यात धाव घेतली.

आरोपी विरोधात गुन्हा दाखल

आरोपीचं नाव अब्दुल सुफियान हिफजूर (वय 30) असं आहे. पीडितेने आरोपी विरोधात फसवणूक, धमकी आणि बलात्काराची तक्रार केली आहे. पीडितेने माहिम पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी आरोपी विरोधात कलम 376 (2) (N) आणि 384 अंतर्गत गुन्हा दाखल करत मुंबईच्या धारावी येथून बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपीला कोर्टात सादर केलं असता त्याला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पीडितेला आरोपी विवाहित असल्याचं माहिती पडलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणीची ओळख काही महिन्यांपूर्वी एका जिममध्ये झाली होती. मात्र, त्यानंतर दोघांमध्ये संबंध वाढत गेले. आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले. पण लग्न केले नाही. पीडितेने आरोपीबाबत अधिक चौकशी केली असता तेव्हा तिला धक्कादायक माहिती समोर आली. कारण आरोपीचं आधीच लग्न झालेलं होतं.

पोलिसांचा तपास सुरु

पीडित तरुणीने विरोध केला तेव्हा आरोपीने तिचे अश्लील आपत्तीजनक व्हिडीओ बनवले. त्यानंतर संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने पीडितेकडून 12 तोळे सोने आणि पैसे उकळले. त्यानंतर तो वारंवार पीडितेकडून पैसे उकळू लागला. अखेर पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपीला धारावी येथून अटक केली. आरोपीने आणखी कोणत्या मुलीला फसवून लुबाडलं आहे का? याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे.

हेही वाचा : 6 लाखांचं डील, मुलीशी लग्न करण्याचं ठरलं, मुलाने 50 हजारही दिले, पण नवरदेवाला लग्नाआधीच खरं समजलं आणि….

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI