वड्याचं तेल वांग्यावर, वाद लोकलमधील प्रवाशांशी, हत्या फूटपाथवर झोपलेल्या दोघांची

मुंबई लोकलमध्ये प्रवाशांसोबत झालेल्या वादानंतर आरोपीला भायखळा स्टेशनवर उतरावं लागलं. मात्र या घटनेमुळे वैतागून त्याने या घटनेशी काही देणंघेणं नसलेल्या फूटपाथवर झोपलेल्या दोघा जणांवर राग काढला. त्यांची निर्घृण हत्या केली

वड्याचं तेल वांग्यावर, वाद लोकलमधील प्रवाशांशी, हत्या फूटपाथवर झोपलेल्या दोघांची
crime
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 2:40 PM

मुंबई : ‘वड्याचं तेल वांग्यावर’ ही म्हण सर्वश्रुत आहे. एखाद्या गोष्टीचा राग दुसऱ्यावर काढल्यानंतर ही म्हण वापरली जाते. अशाच काहीशा प्रकारात मुंबईमध्ये दोघा जणांना नाहक प्राण गमवावे लागले. लोकल ट्रेनमध्ये चढताना अडवल्याने झालेल्या वादावादीचा राग प्रवाशाने फूटपाथवर राहणाऱ्या निष्पाप व्यक्तींवर काढला. मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लास कम्पार्टमेंटमध्ये चढताना सहप्रवाशांनी तरुणाला अडवलं. यावेळी झालेल्या वादावादीनंतर संतापलेल्या आरोपीने फूटपाथवर राहणाऱ्या दोघा जणांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी सुरेश शंकर गौडाने पोलिसांच्या चौकशीत सांगितलं की, लोकल ट्रेनमध्ये काही प्रवाशांसोबत त्याचा वाद झाला होता. तो चुकून फर्स्ट क्लास कम्पार्टमेंटमध्ये चढला होता. त्यामुळे काही प्रवाशांनी त्याच्यासोबत गैरवर्तन केलं. त्याला शिवीगाळ केली, त्याला ड्रग अॅडिक्टही म्हणाले. त्यामुळे त्याला भायखळा स्टेशनवर उतरावं लागलं. मात्र या घटनेमुळे वैतागलेल्या आरोपीने देणंघेणं नसलेल्या दोघा जणांवर राग काढला.

सायको किलरला अटक

दक्षिण मुंबईत 15 मिनिटांच्या काळात दोघांची हत्या करणाऱ्या सायको किलर पोलिसांनी अटक केली होती. संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास तो बदलापूर-सीएसएमटी लोकलमधून भायखळा स्टेशनला उतरला होता. भायखळा आणि जेजे मार्ग भागातील सीसीटीव्ही कॅमेरांमधून पोलिसांनी सुरेश गौडाच्या हालचाली पाहिल्या. 23 ऑक्टोबरला भायखळा फळ बाजार आणि जेजे मार्गाच्या फूटपाथवर झोपलेल्या दोघांची हत्या झाली होती. पहिली हत्या 7.50 वाजता, तर दुसरी 8.05 वाजता झाली होती.

लूटमार-हत्या प्रकरणात आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौडाही फूटपाथवर राहतो. तो कर्नाटकातील हासन जिल्ह्याचा रहिवासी आहे. 21 वर्षांपूर्वी तो नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता. आधी त्याने रिक्षा चालवून पोट भरण्यास सुरुवात केली. 2003 मध्ये एका प्रवाशाला लुटल्याप्रकरणी अटक झाली होती. तर एका दरोडा प्रकरणातही तो गजाआड होता. 2015 मध्ये फूटपाथवर राहणाऱ्या टायगरच्या हत्या प्रकरणात तो आरोपी आहे.

संबंधित बातम्या :

फेसबुक लाईव्ह करत 40 ते 50 बाटल्या सिरप प्यायला, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा थरारक बचाव

लक्ष्मीपूजनावेळी घरात घुसून अंदाधुंद गोळीबार, 21 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू, कुटुंबातील पाच जण जखमी

कंपनीला गाडी लावतो, भाड्यावरील 250 गाड्या परस्पर गहाण, पुण्यात माजी उपसरपंचाला बेड्या

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.