दोन कुटुंबातील वाद टोकाला गेला, शेजाऱ्याने महिलेला थेट…; काय घडले नेमके?

दोन कुटुंबात वाद सुरु होता. याप्रकरणी महिला पोलिसात प्रकरणाची अपडेट विचारायला गेली होती. दुसऱ्या कुटुंबाने हे पाहिले आणि थेट महिलेच्या घरी दाखल झाले. यानंतर जे घडले त्याने सर्वच हादरले.

दोन कुटुंबातील वाद टोकाला गेला, शेजाऱ्याने महिलेला थेट...; काय घडले नेमके?
कौटुंबिक वादातून पुतण्याने चौघांना संपवलेImage Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 5:54 PM

मानखुर्द : दोन कुटुंबात झालेल्या वादातून शेजाऱ्याने शेजारणीवर गोळी झाडल्याची घटना मानखुर्द येथील इंदिरा नगर परिसरात घडली. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. फरजाना इरफान शेख असे हत्या करण्यात आलेल्या 31 वर्षीय महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे, तर एक महिला आरोपी फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. याप्रकरणी मानखुर्द पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतिश सिंग आणि सोनू सिंग अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, ते दोघेही पिता-पुत्र आहेत. तर शिल्पा सिंग ही फरार आहे. भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये खून आणि प्राणघातक शस्त्रांचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिता-पुत्राची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पीडित महिलेने शेजाऱ्यावर विनयभंगाचा आरोप केला होता

रामनवमीनंतर दोन दिवसांनी फरजाना शेख हिने मानखुर्द पोलिसात सोनू सिंगचा मुलगा आदित्य सिंग याने आपल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला, परंतु प्रकरण अद्याप तपासाधीन असल्याने कोणालाही अटक झाली नाही. यानंतर आदित्य देखील फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

महिला पोलीस ठाण्यात अपडेट विचारायला गेल्याने तिच्यावर हल्ला

शनिवारी सकाळी फरजाना या प्रकरणाची सद्यस्थिती विचारण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली होती. यावेळी आरोपी शिल्पाने तिला पाहिले. फरजाना आदित्यला अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकत असल्याच्या भीतीने सोनू सिंग आणि आतिश हे चॉपर आणि पिस्तुल घेऊन तिच्या घरी गेले. यानंतर आतिशने महिलेवर गोळी झाडली. घटनेनंतर आरोपी फरार झाले.

हे सुद्धा वाचा

आरोपी पिता-पुत्राला रत्नागिरीतून अटक

पोलिसांनी 10 विशेष पथके तयार करून शनिवारी रात्री उशिरा शोध सुरू केला. ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि कोकण परिसरात पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. अखेर रत्नागिरीतून पिता-पुत्राला अटक करण्यात आली. आदित्यवर बलात्काराच्या आरोपांव्यतिरिक्त, कुटुंबावर खंडणी, वीजचोरी, खुनाचा प्रयत्न आणि प्राणघातक हल्ला असे अनेक गुन्हे मानखुर्द पोलीस ठाण्यात दाखल आहेत. मात्र कोणत्याही प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले हे कुटुंब मानखुर्द येथे राहत होते. परंतु फरजानाने आदित्य सिंगवर बलात्काराचा आरोप लावल्यानंतर ते नवी मुंबईत आले. घटनेच्या दिवशी ते मानखुर्द येथे वैयक्तिक कामानिमित्त आले होते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही कुटुंबांमध्ये विविध कारणांवरून वारंवार भांडणे होत होती.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.