AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उधार घेतलेल्या पैशाच्या बदल्यात नको ती मागणी केली, घर मालकापासून पिच्छा सोडवण्यासाठी महिलेने ‘ही’ युक्ती केली !

घरमालकाचे भाडेकरुच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. याच कारणातून भाडेकरुने घर बदलले. मात्र जुना मालक त्याच्या पत्नीचा पिच्छा सोडत नव्हता. तिने विरोध करताच तिच्या उधार दिलेल्या पैशांची मागणी करायचा.

उधार घेतलेल्या पैशाच्या बदल्यात नको ती मागणी केली, घर मालकापासून पिच्छा सोडवण्यासाठी महिलेने 'ही' युक्ती केली !
शरीरसुखाला नकार देणाऱ्या पत्नीला पतीने संपवलेImage Credit source: Google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: May 02, 2023 | 5:27 PM
Share

सागर : मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील पीजी कॉलेजमधील लॅब टेक्निशियनच्या हत्याकांड प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. लॅब टेक्निशियन रामकिशोर वशिष्ठची हत्या त्याच्याच घरात भाड्याने राहणाऱ्या भाडेकरूच्या पत्नीने घडवून आणल्याचे उघडकीस आले आहे. घरमालक रामकिशोरने आरोपी महिलेला पैसे उधार दिले होते. ते पैसे वसूल करण्याची धमकी देत रामकिशोरने आरोपी महिलेकडे शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली होती. वारंवार पैसे आणि शरीरसंबंध ठेवण्यासाठी तगादा लावल्यामुळे त्रासलेल्या भाडेकरू महिलेने अखेर हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

घरमालक अडकला होता प्रेमाच्या जाळ्यात

भाडेकरूच्या पत्नीने घरमालक रामकिशोरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ही घटना घडवली. रामकिशोर हा उधार घेतलेले पैसे परत देण्याचे कारण देत आरोपी महिलेचा पिच्छा करीत होता. त्याच्या वारंवारच्या त्रासाला कंटाळलेल्या महिलेने हत्येचा कट आखला. त्यानंतर रामकिशोरला गावाबाहेर नेण्यात आले आणि त्याचे दोन्ही हात बांधून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.

आरोपींना उत्तरप्रदेश येथून अटक

याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी भाडेकरू संतोष, त्याची पत्नी आणि मेहुण्याला उत्तर प्रदेशातील मथुरा येथून अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. स्थानिक न्यायालयाने सर्व आरोपींची कारागृहात रवानगी केली आहे. पोलिसांनी आरोपींची कोठडीत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी कलम 302 नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

घटनास्थळावरून चप्पल, मोबाईल आणि इतर वस्तू जप्त

आगसौद पोलीस स्टेशन हद्दीत कथई गावाजवळील शेतात 27 एप्रिल रोजी मृतदेह असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. अधिक तपासाअंती तो मृतदेह बीना येथील पीजी कॉलेजचा लॅब टेक्निशियन रामकिशोरचा असल्याचे समजले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक चप्पल, सिम नसलेला मोबाईल आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत.

नेमके प्रकरण काय आहे?

मुख्य आरोपी संतोष हा सुमारे अडीच वर्षांपूर्वी पत्नीसह रामकिशोरच्या घरात भाड्याने राहत होता. रामकिशोरचे त्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संतोषला संशय होता. यामुळे संतोषने सहा महिन्यांपूर्वी घर सोडले आणि दुसऱ्या ठिकाणी भाड्याने राहू लागला. मात्र त्यानंतरही रामकिशोर हा संतोषच्या पत्नीला भेटायला येत असे. पत्नीने विरोध केल्यानंतर रामकिशोरने कर्जाचे पैसे परत करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली.

यामुळे मुख्य आरोपी संतोष, त्याची पत्नी आणि मेहुणा या तिघांनी रामकिशोरच्या हत्येचा कट रचला. रामकिशोरची हत्या केल्यानंतर तिघेही त्याचा मृतदेह निर्जन ठिकाणी घेऊन जात होते. मात्र रात्री काही लोक येत असल्याचे पाहून त्यांनी शेतातच मृतदेह टाकून दिला आणि तेथून पळ काढला.

Follow Us
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत