AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : तंगी असताना अनेकदा त्यांच्या घरी जाऊन जेवायचा.. ज्यांच्यामुळे पोट भरलं, तो त्यांच्यावरच उलटला; त्याने असं का केलं ?

वाईट काळात ज्यांनी मदत केली, पोटभर जेवायला दिलं त्यांच्याचविरोधात तो इसम का गेला, त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून ते अधिक तपास करत आहेत.

Mumbai Crime : तंगी असताना अनेकदा त्यांच्या घरी जाऊन जेवायचा.. ज्यांच्यामुळे पोट भरलं, तो त्यांच्यावरच उलटला; त्याने असं का केलं ?
| Updated on: Sep 22, 2023 | 10:31 AM
Share

मुंबई | 22 सप्टेंबर 2023 : माणूस हा फार गुंतागुतीचा असतो. एखाद्या व्यक्तीवर भरभरून प्रेम करेल पण दुसऱ्या व्यक्तीकडे लक्षही देणार नाही कदाचित. पडत्या काळात ज्यांनी मदत केली त्यांना लक्षात ठेवतात ती माणसं पुढे जातात. पण मदत काही माणसं अशीदेखील असतात जी मदत करणाऱ्यांना विसरतातच एवढेच नव्हे तर कधीतरी त्यांच्यावरच उलटतात. त्यामुळे अशा लोकांपासून फारच सावध राहण्याची गरज आहे.

अशीच एक घटना मुंबईतदेखील (mumbai crime) घडली आहे, तेथे एका इसमाला त्याच्या तंगीच्या काळात एका कुटुंबाने मदत केली, पोटभर जेवायलाही दिले. पण तो माणूस त्यांच्यावरच उलटला आणि तो ही असा भयानक पद्धतीने की माणुसकीवरचा विश्वासच उडून जावा. मुंबईतील चेंबूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका 30 वर्षांच्या इसमाने घरात घुसून एक महिला व तिच्या मुलीवर हल्ला करत (attack with knife) त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने स्वत:चा जीवही घेतला, असे पोलिसांनी सांगितले. शहरातील या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली असून दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

बुधवारी रात्री 8:45 च्या सुमारास चेंबूरमधील साईबाब नगर भागात ही धक्कादायक घटना घडली. आरोपी हा रात्रीच्या सुमारास घरात शिरला आणि त्याने समोर आलेल्या महिलेवर चाकूने हल्ला केला. तिची मुलगी आईला वाचवण्यासाठी पुढे आली तर त्याने तिच्यावरही वार केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पीटीआयच्या वृत्तानुसार, राहूल निशाद ( वय 30) असे आरोपीचे नाव होते. तो पोटापाण्यासाठी स्थानिक बाजारात छोटे-मोठे उद्योग करायचा. बुधवारी रात्री तो पीडित महिलेच्या घरात घुसला आणि त्याने दरवाजा घट्ट लावून घेतला. त्यानंतर त्याने त्या महिलेवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात तिची छाती, गळा आणि हातांवर गंभीर जखमा झाल्या. आईवर झालेला हल्ला पाहून तिची 15 वर्षांची मुलगी तिला वाचवण्यासाठी मध्ये पडली असता, राहुलने तिच्याही हातावर आणि गळ्यावर वार केले. मी तुम्हाला मारून टाकेन असं मोठमोठ्याने ओरडत तो त्यांच्यावर चाकू चालवक होता. पीडित महिला व तिच्या मुलीने कसाबसा दरवाजा उघडला आणि त्या जीव वाचवून पळाल्या. मात्र त्या गेल्यानंतर राहूल याने चाकूने वार करून स्वत:चं आयुष्य संपवलं, असं पोलिसांनी सांगितलं,

पीडितेच्या पतीशी होती ओळख

आरोपी राहूल याची पीडितेच्या पतीशी आधीपासूनच ओळख होती. कोरोना काळात आर्थित तंगी असताना तो अनेकवेळा पीडित कुटुंबाच्या घरी जेवणासाठी येत असे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तो त्यांच्या घरी फिरकला नव्हता. आता त्याने अचानक हा हल्ला का केला, यामागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या हल्ल्यानंतर मुलीसह घराबाहेर पडलेल्या पीडितेने तिच्या पतीशी कसाबसा संपर्क साधला. अखेर त्यांना उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता सुधारत असल्याचे समजते.

आरोपी निषादवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर त्याच्या आत्महत्येप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.