AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : कर्नाटक, तेलंगण, हैदराबाद, कुठे कुठे नाही लपला… पोलिसांनी ४० वर्षांनीदेखील गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या ! थरारक शोधाचा प्रवास…

गेल्या ४० वर्षांपासून फरार असलेल्या डोंगरी येथील एका वाँटेड आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने देशातील विविध राज्यात आसरा घेतला. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश मिळालं.

Mumbai Crime : कर्नाटक, तेलंगण, हैदराबाद, कुठे कुठे नाही लपला... पोलिसांनी ४० वर्षांनीदेखील गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या ! थरारक शोधाचा प्रवास...
| Updated on: Oct 14, 2023 | 12:49 PM
Share

मुंबई | 14 ऑक्टोबर 2023 : कानून के हात बहोत लंबे होते है.. कोणताही गुन्हेगार एखआदा गुन्हा करून फार काल लपून राहू शकत नाही. कधी ना कधी त्याचा गुन्हा उघडकीस येतोच आणि त्याला कायद्याला शरण जावेच लागते. असाच एक सराईत गुन्हेगार तब्बल ४० वर्ष पोलिसांना गुंगारा देत होता. आपला गुन्हा पचला या भ्रमात तो निवांत जगत होता. मात्र पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ करून, देश पिंजून काढला आणि त्याला शोधत अखेर बेड्या ठोकल्याच.

गेल्या ४० वर्षांपासून फरार असलेल्या डोंगरी येथील एका वाँटेड आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी शुक्रवारी जाहीर केले. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 1982 मध्ये कोर्टाने सय्यद ताहेर सय्यद हासीम या आरोपीला दोषी ठरवले होते. मात्र पॅरोलवर बाहेर आलेला सय्यद नंतर तुरूंगात परतलाच नाही. अखेर 1985 साली न्यायालयाने त्याला फरार घोषित केले. बराच शोध घेऊनही पोलिसांना तो काही सापडलाच नाही. डोंगरी येथील त्याचं घरही रिकामं होतं. त्याच्या कुटुंबासह सय्यद कधीच फरार झाला होता.

कसा लागला शोध ?

मात्र काही महिन्यांपूर्वी, न्यायालयाने सय्यदविरुद्ध स्थायी वॉरंट जारी केल्यानंतर डोंगरी पोलिसांनी त्याचा पुन्हा शोध सुरू केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तारी खाडे यांनी पीएसआय शान सुंदर भिसे यांच्या नेतृत्वाखाली सय्यदच्या शोधासाठी एक पथक तयार केले. मात्र त्यांच्याकडे अतिशय सीमित माहिती होती. डोंगरी येथील त्याचे घर हेच शेवटचे ठिकाण पोलिसांना माहीत होते. त्यापुढे त्याचा काहीतच पत्ता लागत नव्हता. अखेर त्यांनी सय्यदच्या ओळखीच्या इतर लोकांची चौकशी केल्यावर त्यांना एक लीड मिळाला, तो म्हणजे दफनभूमी.

३ दिवस अथक पाळत ठेवल्यावर मारला छापा

सय्यद हा इराणी शिया मुस्लीम असल्याने, त्याच्या आईच्या मृत्यूनंतर तो कदाचित माझगाव (रेहमताबाद कब्रिस्तान) येथील इराणी शिया स्मशानभूमीला भेट देऊ शकतो, अशी खबर पोलिसांना मिळाली होती. मात्र ही माहितीदेखील पाच वर्षे जुनी असल्याने पोलिस अधिक तपशीलांचा तपास करत होते. सय्यद हा हैदराबादच्या एरागड्डा नावाच्या ठिकाणी स्थलांतरित झाल्याची खबर त्यांना मिळाली. मात्र तिथे तो नेमका कुठे राहतो, यासाठी पोलिस त्याचा फोन नंबरही शओधत होते, काही दिवसांनी खबऱ्यांमार्फत त्यांना तोही मिळाला.

त्यावरून पोलिसांनी त्याचे लोकेशन शोधले आणि एका टीमने त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली. अखेर तीन दिवस आणि रात्र सतत पाळत ठेवल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याच्या घरावर छापा टाकून त्याला अटक करण्यात आली. सय्यद याला 12 मुलं असून सर्वजण व्यवस्थित सेटल होऊन कामकाज करतात. त्याची एक मुलगी डेंटिस्ट आहे.

पूर्वायुष्यात केलेल्या गुन्ह्यांमुळे तो (सय्यद) सतत भीतीखाली जगायचा. पोलिसांपासून वाचण्यासाठी तो कर्नाटकमधील गुलबर्गा, नंतर तेलंगणामध्ये राहिला. अखेर हैदराबादमध्ये येऊन स्थायिक झाला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणपणी सय्यद हा अंडरवर्ल्ड आणि कॉन्ट्रॅक्ट किलिंगशी संबंधित अनेक गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील होता. शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.