तंबाखूयुक्त हुक्का तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड, पोलिसांकडून 17 लाखांचा हुक्का जप्त

तंबाखूयुक्त हुक्का तयार करणाऱ्या मुंबईतील शिवडी येथील एका कारखान्यावर धाड टाकण्यात आलीये. (mumbai police raid tobacco hookah)

तंबाखूयुक्त हुक्का तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड, पोलिसांकडून 17 लाखांचा हुक्का जप्त
सांकेतिक फोटो
| Updated on: Mar 27, 2021 | 6:16 PM

मुंबई : तंबाखूयुक्त हुक्का तयार करणाऱ्या मुंबईतील शिवडी येथील एका कारखान्यावर धाड टाकण्यात आलीये. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या शाखेने ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 17 लाखांचा हुक्का जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. या आरोपीचे नाव फकरुद्दीन चितलवाला असे आहे. त्याच्यासोबत आणखी कोण-कोण आहेत; याचा तपास केला जातोय. (Mumbai police raid on factory manufactures tobacco hookah)

राज्यात सामान्य हुक्क्यावर बंदी नसली तरी तंबाखूयुक्त हुक्क्याचे उत्पादन करण्यास बंदी आहे. मात्र, मुंबईतील शिवडी येथे एका कारखान्यात तंबाखूयुक्त हुक्का तयार केला जात असल्याची खबर मुंबईच्या गुन्हे शाखेच्या कंट्रोल युनिटला मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हुक्का तयार करण्याच्या कारखान्यावर छापा टाकला. दारूखाना माजगाव येथे हा कारखाना होता. येथे तंबाखूयुक्त हुक्का बनवला जात होता. मिळालेल्या माहितीनुसार येथे मागील दोन वर्षांपासून तंबाखूयुक्त हुक्का तयार केला जात होता.

या कारखान्याची माहिती मिळतात पोलिसांनी धाड टाकून येथील तंबाखूयुक्त हुक्का जप्त केला. पोलिसांनी यावेळी तब्बल 17 लाखांचा हुक्का जप्त केला आहे. तसेच तंबाखू प्रतिबंधक कायद्यानुसार या प्रकरणात कारवाई करण्यात आली असून एकाला अटक करण्यात आले आहे. या आरोपीला शिवडी पोलिसांकडे सोपवण्यात आले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. तंबाखूयुक्त हुक्का उत्पादनामध्ये आणखी कोणी आहे का?,याचा तपास पोलीस करत आहेत.

नवी मुंबईत क्लबवर धाड, 200 तरुण-तुरुणी ताब्यात

नवी मुंबईतील ‘क्लब नशा’ पबमध्ये पोलिसांनी आज ( 27 मार्च) धाड टाकली आहे. या पबमधून 150 ते 200 तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आलं आहे. पबमध्ये दिवसाढवळच्या नियमांचं उल्लंघन करुन धांगडधिंगा सुरु होता. नवी मुंबईत प्रशासनाचे आदेश झुगारुन रात्री उशिरापर्यंत पब, हुक्का पार्लर आणि डान्स बार सुरु असतात. त्या पार्श्वभूमीवरच पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पाम बीच गॅलरिया या मॉलमध्ये क्लब नशा आहे. या क्लबमध्ये पोलिसांनी अचानक धाड टाकली. त्यावेळी 150 ते 200 तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आलं. कोरोना नियमांचे उल्लंघन केलं म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ACP मेंगडे यांनी APMC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामुगुडे यांच्या नेतृत्वात ही धाड टाकण्यात आली.

 

इतर बातम्या :

स्पेशल 26 स्टाईल लूट, खोट्या करप्शन अधिकाऱ्यांचा छापा, तब्बल 23 लाख घेऊन फरार

दुसरीत शिकणाऱ्या नातीसोबत अश्लील कृत्य, मुलीवरही अनेकदा बलात्कार, 65 वर्षीय वृद्धाचा संतापजनक प्रताप

Deepali Chavan Suicide | शिवकुमारला ताब्यात द्या, महिला आक्रमक, पोलिसांनी आरोपीला साखळी करुन कोर्टात नेलं

(Mumbai police raid on factory manufactures tobacco hookah)