Nagpur Crime : मुलीला गाडण्याची धमकी देणाऱ्या पतीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल, आरोपी फरार

राहुल कुठलाही कामधंदा न करता पत्नीच्या कमाईवर दारूचे व्यसन पूर्ण करायचा. दारू पिऊन घरी पत्नीला मारहाण करायचा. मात्र काही दिवसांनी आरोपी राहुलचे बिंग फुटले.

Nagpur Crime : मुलीला गाडण्याची धमकी देणाऱ्या पतीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल, आरोपी फरार
मुलीला गाडण्याची धमकी देणाऱ्या पतीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 14, 2022 | 9:07 PM

नागपूर : दारु पिऊन पत्नीला त्रास देत स्वतःच्याच मुलीला गाडण्याची धमकी (Threat) देणाऱ्या आरोपी विरोधात नागपूरच्या जरीपटाका पोलीस ठाण्यात गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार (Absconding) झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राहुल बालेकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राहुलची आधीच दोन लग्ने झाली होती. ही माहिती लपवून त्याने मनिषा नामक महिलेशी तिसरा विवाह केला. राहुलच्या प्रेमात आकंठ बुडाल्याने तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन राहुलसोबत लग्न केले होते. त्यामुळे आता परिवारापासून देखील ती तुटली असून स्वतःचा आणि चिमुकलीचा जीव वाचविण्याची धडपड करत आहे.

दारुच्या नशेत मुलीला गाडण्याची देत होता धमकी

आरोपी राहुल बालेकरची आधीच दोन लग्न झाली असताना त्याने मनिषा हिला अंधारात ठेवून तिच्याशी प्रेमविवाह केला. विवाहानंतर जोडप्याने एका मुलीला जन्म दिला. राहुल कुठलाही कामधंदा न करता पत्नीच्या कमाईवर दारूचे व्यसन पूर्ण करायचा. दारू पिऊन घरी पत्नीला मारहाण करायचा. मात्र काही दिवसांनी आरोपी राहुलचे बिंग फुटले. त्याची आधीच दोन लग्न झाल्याचे कळल्याने राहुलने आपल्या तिसऱ्या पत्नीला त्रास देणे सुरू केले. हा छळ इतक्यावरच थांबला नाही तर त्याच्या तीन वर्षीय चिमुकलीला जिवंत गाडण्याची धमकी राहुल देत होता. त्यामुळे पत्नीने पोलिसात तक्रार दिली आहे. या संदर्भात जरीपटका पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. (A case has been registered against the husband who threatened to kill his daughter in Nagpur)