गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा, आधी कुटुंबियांना मदत, नंतर प्रेमाच्या जाळ्यात अडकत विद्यार्थीनीवर बलात्कार

अरबी भाषेचे शिक्षण देणाऱ्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीत समोर आली आहे.

गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा, आधी कुटुंबियांना मदत, नंतर प्रेमाच्या जाळ्यात अडकत विद्यार्थीनीवर बलात्कार
| Edited By: | Updated on: Jul 15, 2021 | 7:15 PM

नागपूर : नागपुरात गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अरबी भाषेचे शिक्षण देणाऱ्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीत समोर आली आहे. रफिक खान उर्फ मौलाना हाफिज असे आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आरोपीकडून लॉकडाऊन काळात पीडितेच्या कुटुबियांना मदत

या प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीची आरोपी रफिक खानसोबत जुनी ओळख आहे. लॉकडाऊनच्या काळात आरोपीने पीडित कुटुंबाची थोडी मदत केली होती ज्यामुळे त्यांचा आरोपीवर विश्वास बसला होता. आरोपी रफिक हा अरबी भाषा शिकवत असल्याने पीडित तरुणीने त्याच्याकडे शिकवणी लागली होती.

पीडितेकडून अखेर पोलिसात तक्रार

आरोपीने पिडीत विद्यार्थिनीला तुझ्या कुटुंबाची मदत करणार असल्याचे सांगत जवळीक साधली. त्याने पीडितेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आरोपी तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याने पीडित तरुणीने सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून आरोपीला अटक

आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. मार्च महिन्यात त्याने पीडित तरुणीसोबत साखरपुडा करण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र या संदर्भात बाल सुरक्षा अधिकाऱ्यांनी आरोपीचा हा प्रयत्न हाणून पाडत पीडितेची रवानगी बाल सुधारगृहात केली होती. काही दिवस तिथे राहिल्यानंतर तरुणी घरी परत आली. मात्र त्यानंतर सुद्धा आरोपी वारंवार भेटायला बोलवत असल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने आरोपी विरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे, ज्याच्याआधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे (coaching teacher rape on minor student in Nagpur).

हेही वाचा : 

गळ्यातील दीड तोळ्याच्या सोन्याच्या चैनीवर मित्रांचा डोळा, संधी मिळताच हत्या, चैन घेऊन लंपास

प्रेमभंग, सासरी होणाऱ्या त्रासामुळे 5 महिन्यांत 26 आत्महत्या, पिंपरी चिंचवडमध्ये चाललंय काय ?