कधीच पकडली गेली नसती खुनी सून, पोलिसांनी तो अपघात मानला होता, पण एक चूक पडली भारी

नागपूरमध्ये एक धक्कादायक खूनाचं प्रकरण समोर आले आहे. नागपुरातील एका सूनेनं आपल्याच सासऱ्याला गाडीने उडवलं आणि हा खून नसून अपघात असल्याचं भासवलं. पण एका व्यक्तीच्या चुकीमुळे हा खून असल्याचं समोर आलं. अन्यथा पोलिसांनी ही केस बंद केली होती.

कधीच पकडली गेली नसती खुनी सून, पोलिसांनी तो अपघात मानला होता, पण एक चूक पडली भारी
Follow us
| Updated on: Jun 13, 2024 | 4:06 PM

नागपूर जिल्ह्यातील हिट अँड रन प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झालाय. नागपूर हिट अँड रन प्रकरण हा अपघात नसून खुन असल्याचं समोर आलंय. पोलिसांनी हा हत्येचा कट उघडकीस आणला आहे. पोलिसांना देखील आधी हा अपघात असल्याचं वाटलं होतं. पण नंतर पोलिसांना संशय आला. सुनेने आपल्या सासऱ्याचा खून केल्याचं समोर आलं आहे. सूनने सासऱ्याच्या हत्येचा कट रचला होता. सासऱ्याला एका गाडीने उडवलं होतं. सुरुवातीला हा अपघात असल्याचं सगळ्यांना वाटलं पण जेव्हा पोलिसांनी खोलवर चौकशी केली तेव्हा एका चुकीमुळे सूननेच खून केल्याचं समोर आलं.

22 मे रोजी नागपूरच्या अजनी परिसरात हिट अँड रन प्रकरण पोलिसांनी अपघात असल्याचं मानून केस बंद केली होती. पण आरोपीची एक चूक महागात पडली. नेहमी मित्रांकडे पैसे मागणाला, कधीही कोणाला दारु न पाजणारा अचानक जेव्हा मित्रांना दारूच्या पार्ट्या देऊ लागला. मित्रांसोबत कधी दारू न पिणारा दारु पिऊ लागला तेव्हा आरोपी नीरज निमजे याच्यावर संशयाची सूई फिरली.

खून कसा उघड झाला?

नीरज निमजे यांच्याकडे अचानक भरपूर पैसे आल्याची माहिती पोलिसांना त्याच्या जवळच्या लोकांनी दिली. यानंतर पोलीस सतर्क झाले आणि त्यांनी पुन्हा तपास सुरू केला. नागपूर पोलिसांनी तपास सुरु केला की, कोणत्या अपघातातील आरोपी चालकाला अद्याप अटक झालेली नाही. त्यानंतर पोलिसांना कळले की, नागपुरातील बालाजीनगर भागातील पुरुषोत्तम पुत्तेवार यांच्या आरोपीला पकडलेले नाही.

नागपूर पोलिसांनी त्यानंतर नीरज निमजे याला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली, त्यानंतर पुरुषोत्तम पुत्तेवार यांचा मृत्यू हा अपघात नसून नियोजनबद्ध खून असल्याची कबुली त्याने दिली. आरोपी नीरज निमजे यानेच या हत्येमागे दुसरं कोणी नसून पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून असल्याची कबुली दिली. अर्चना पुट्टेवारला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आले.

पुरुषोत्तम पुत्तेवार यांना कारने उडवणारा दुसरा कोणी नसून नीरज निमजे हाच गाडी चालवत होता. पुत्तेवार कुटुंबातील घरगुती चालक सार्थक बांगडे हा त्यांच्या शेजारी बसला होता. तर निमजेचा मित्र सचिन धार्मिक हा निमजे आणि बांगडे यांना दुचाकीवरून पुरुषोत्तम यांचा पाठलाग करुन त्यांचं ठिकाण सांगत होता.

Non Stop LIVE Update
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?.
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'.
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप.
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची...
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची....
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्.
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?.
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाला पावसाचा फटका, वाहतुकीला धोका..
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाला पावसाचा फटका, वाहतुकीला धोका...
कुठे कोसळणार मुसळधार? IMD चा अंदाज काय? कुठल्या भागात शाळांना सुट्टी?
कुठे कोसळणार मुसळधार? IMD चा अंदाज काय? कुठल्या भागात शाळांना सुट्टी?.
दादांसाठी खास केक, केकवरील 'त्या' मजकुराची होतेय चर्चा, बघा व्हिडीओ
दादांसाठी खास केक, केकवरील 'त्या' मजकुराची होतेय चर्चा, बघा व्हिडीओ.
कोणी आणलं कलेक्टरिन बाईंना अडचणीत? 'या' तरूणाचं एक ट्विट, राज्यात खळबळ
कोणी आणलं कलेक्टरिन बाईंना अडचणीत? 'या' तरूणाचं एक ट्विट, राज्यात खळबळ.