मस्त पाऊस ! जंगलात पर्यटनासाठी नागपूरकर गेले, पण पुलाखाली मृतदेह, एकच खळबळ

| Updated on: Sep 22, 2021 | 2:26 PM

नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडेगावच्या जंगलातील खेकरानाला परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळला आला आहे. प्रदीप जनार्धन बागडे असे मृताकाचे नाव आहे.

मस्त पाऊस ! जंगलात पर्यटनासाठी नागपूरकर गेले, पण पुलाखाली मृतदेह, एकच खळबळ
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडेगावच्या जंगलातील खेकरानाला परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळला आला आहे. प्रदीप जनार्धन बागडे असे मृताकाचे नाव आहे. मृतक प्रदीपचा खून चार ते पाच दिवसांपूर्वी झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच हत्या अन्य ठिकाणी केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह बडेगावच्या जंगलात फेकला असावा, असा अंदाज पोलिसांनी प्राथमिक तपासात वर्तवला आहे.

खिशात असलेल्या ओळखपत्रावरुन मृतदेहाची ओळख

नागपुरात सध्या पाऊस चांगला सुरु आहे. त्यामुळे अनेक उत्साही नागरीक जंगलात पर्यटन करण्यासाठी जात आहेत. त्यातील काही पर्यटकांना खेकरानाला येथील महारकुंड शिवारातील एका पुलाखाली एका इसमाचा मृतदेह दिसला. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती खापा पोलिसांना दिली. संबंधित प्रकाराची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी मृतकाच्या खिशात असलेल्या ओळखपत्रावरुन मृतदेह प्रदीप जनार्धन बागडे या इसमाचा असल्याचं निष्पन्न झालं.

आरोपींचा शोध सुरु

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कुणालाही चौकशीसाठी ताब्यात घेतलेले नाही. मृतक प्रदीपचा कुणासोबत वाद होता का? या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

आरोपींनी मृतदेह पुलाखाली असलेल्या सिमेंटच्या पायलीमध्ये लपवला

अज्ञात आरोपींनी प्रदीप बागडेचा मृतदेह महारकुंड शिवारातील पुलाखाली असलेल्या सिमेंटच्या पायलीमध्ये लपवला होता. प्रदीपचा खून इतरत्र कुठे केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह सीमेंटच्या पायलीमध्ये ठेवला होता. मात्र जंगलातील प्राण्यांनी तो मृतदेह बाहेर ओढल्याने ही घटना उघडकी आली आहे.

नागपूर हत्या प्रकरणात देशात अव्वल

नागपूर शहरात गंभीर गुन्हे दिवसागणिक वाढताना दिसत आहेत, त्यामुळेच दुर्दैवाने नागपूरला क्राईम कॅपिटल म्हणून देखील ओळख मिळाली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीवरुन हे स्पष्ट झाले आहे. शहरात वर्षाला शंभरच्या वर हत्या होत असल्याची कबुली पोलिसही देत असले तर शहराच्या सीमा वाढल्या असून त्या लोकसंख्येचा उल्लेख त्यात नसल्याने आकडा मोठा दिसत असल्याचं सांगितलं जात आहे.

वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागपूरने गुन्हे क्षेत्रात राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. या क्षेत्रात आता राज्यातील इतर शहरांसोबत तुलनाच होऊ शकत नसल्याने नागपूर शहराने आपली वाटचाल राष्ट्रीय पातळीवर सुरु केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारी वरून हे स्पष्ट झाले आहे.

हत्या प्रकरणात नागपूरने यंदा पाटण्यालाही मागे टाकले

नागपुरात हत्या प्रकरणाचा दर 3.9 टक्के आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या 2020 वर्षाच्या गुन्हे विषयक अहवालानुसार दर एक लाख लोकसंख्येमागे नागपुरात हत्येच्या प्रकरणांचा दर 3.9 टक्के एवढा असून हा देशात सर्वाधिक आहे. या अहवालानुसार 2020 मध्ये बिहारची राजधानी पाटणामध्ये हत्येची 79 प्रकरणं नोंदवली गेली असून दर एक लाख लोकसंख्येच्या प्रमाणे पाटण्यात हत्येचा दर 3.85 आहे. म्हणजेच दर एक लाख लोकसंख्येमागे हत्येच्या प्रकरणासंदर्भात नागपूरने यंदा पाटण्याला ही मागे टाकले आहे.

विशेष म्हणजे गेल्या वर्षी यासंदर्भात नागपूरचे स्थान पाटण्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर होते. गेल्या वर्षी 2019 मध्ये नागपुरात हाच दर 3.6 टक्के होता, तर पाटण्यात तो 4.9 टक्के एवढा होता. म्हणजेच दर एक लाख लोकसंख्येमागे हत्येच्या प्रकरणात पाटण्याची स्थिती सुधारली आहे तर नागपुरात स्थिती आणखी बिघडली आहे.

हेही वाचा :

दुभाजक तोडून ट्रकची कारला धडक, एकाचा मृत्यू, महिला पोलिसाच्या पतीसह दोघे जखमी

उस्मानाबादेत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू दागिन्यांसह पळाली, नांदेडमध्ये बेड्या