बुलडाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाईगिरी, तालुकाध्यक्षाची महिला ग्रामपंचायत सदस्याला मारहाण

बुलडाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाईगिरी, तालुकाध्यक्षाची महिला ग्रामपंचायत सदस्याला मारहाण
बुलडाण्यात राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांची भाईगिरी

बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आधीचे खामगाव तालुकाध्यक्ष भरत लाहुडकार एका हत्या प्रकरणात जेलमध्ये आहेत. तर खामगाव राष्ट्रवादीचे नवीन तालुकाध्यक्ष अंबादास हिंगणे यांचीसुद्धा भाईगिरी आता समोर आली आहे.

गणेश सोळंकी

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 29, 2021 | 12:57 PM

बुलडाणा : बुलडाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाईगिरी पाहायला मिळत आहे. आधीचा तालुका अध्यक्ष मर्डर केसमध्ये तुरुंगात असताना, नव्या तालुका अध्यक्षांनी महिला ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे बुलडाण्यातील स्थानिक राजकारणात चाललंय तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आधीचे खामगाव तालुकाध्यक्ष भरत लाहुडकार एका हत्या प्रकरणात जेलमध्ये आहेत. तर खामगाव राष्ट्रवादीचे नवीन तालुकाध्यक्ष अंबादास हिंगणे यांचीसुद्धा भाईगिरी आता समोर आली आहे. हिंगणेंनी एका महिला ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

काय आहे प्रकरण?

खामगाव राष्ट्रवादीचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष अंबादास हिंगणे यांनी बुलडाण्यातील आमसरी गट ग्रामपंचायतीच्या महिला सदस्याला काही जणांच्या साथीने मारहाण केल्याचा आरोप आहे. या महिलेने पोलिसात तक्रार दिली असून अंबादास हिंगणे यांच्यासह पाच जणांच्या विरोधात विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बुलडाण्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना कोणाचे अभय?

या घटनेमुळे बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना कुणाचे अभय मिळत आहे? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. याआधीचे खामगाव तालुका अध्यक्ष भरत लाहुडकार एका मर्डर केसमध्ये तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. तर नवीन तालुकाध्यक्ष अंबादास हिंगणे यांनीही अशा पद्धतीने भाईगिरी केल्याने एकच संताप व्यक्त केला जात आहे. नव्या तालुका अध्यक्षांच्या विरोधात जलंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप पोलिसांकडून त्यांना पकडण्यात आलेले नाही.

संबंधित बातम्या :

बीडमध्ये जुगार अड्ड्यावर मध्यरात्री छापा, भाजप जिल्हाध्यक्षांसह 51 जणांवर गुन्हा

खोदता खोदता पहाड सापडे? आता जैनच्या कन्नौजच्या घरातून 19 कोटी रोख सापडले, 23 किलो सोने

मॅट्रिमोनियल साईटवर ओळख, आर्थिक फसवणूक ते अनैसर्गिक बलात्कार, पुण्यात तिघांवर गुन्हा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें