बहिणीच्या मैत्रिणीवर अत्याचार, यवतमाळमध्ये कुख्यात गुंडाची पीडितेला बेदम मारहाण

| Updated on: Oct 17, 2021 | 8:40 AM

नवरात्रौत्सवाचा जागर सुरु असतानाच गुंडाने बहिणीच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अत्याचार केल्यानंतर तो थांबला नाही, तर पीडितेला बेशुद्ध करुन अज्ञात स्थळी नेत बेदम मारहाणही केली

बहिणीच्या मैत्रिणीवर अत्याचार, यवतमाळमध्ये कुख्यात गुंडाची पीडितेला बेदम मारहाण
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

यवतमाळ : कुख्यात गुंडाने बहिणीच्या मैत्रिणीवर अत्याचार करुन पीडितेला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यवतमाळ शहरातील जामनकर नगर परिसरात उघडकीस आला आहे. आरोपी अक्षय शरद बगमारे उर्फ बागा फरार आहे.

काय आहे प्रकरण?

नवरात्रौत्सवाचा जागर सुरु असतानाच गुंडाने बहिणीच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अत्याचार केल्यानंतर तो थांबला नाही, तर पीडितेला बेशुद्ध करुन अज्ञात स्थळी नेत बेदम मारहाणही केली. त्यानंतर तिला घरी सोडले. पीडितेचे वडील घरी परतल्यानंतर शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

आरोपी अक्षय बगमारे उर्फ बागा

कुख्यात गुंड अक्षय शरद बगमारे उर्फ बागा असे 25 वर्षीय आरोपीचे नाव आहे. बागा हा अक्षय राठोड टोळीचा सदस्य असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापैकी काही गुन्हे तो अल्पवयीन असतानाच दाखल झाले होते. आरोपी फरार झाला असून अवधुतवाडी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

वडिलांना जीवे मारण्याची धमकी

पीडित तरुणीच्या आईचे कर्करोगाने निधन झाले आहे. याच धसक्याने तिच्या मोठ्या बहिणीनेही प्राण सोडले. त्यामुळे पीडिता आणि तिचे वडील असे दोघेच घरी राहतात. याच संधीचा फायदा घेत अक्षयने पीडितेला तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरी केली.

दारुच्या नशेत अत्याचार

गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता अक्षय पीडितेच्या घरी गेला. त्यावेळी तो दारुच्या नशेत होता. त्याने पुन्हा तिच्यावर अत्याचार करत तिला बेशुद्ध केले. त्यानंतर तिला अज्ञात स्थळी नेत बेदम मारहाणही केली. अखेर तिला रिक्षाने घरी सोडले. पीडितेचे वडील घरी परतल्यानंतर शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पीडित तरुणीच्या शरीरावर मारहाणीचे वळ आहेत. अखेर धीर एकवटून तिने घडला प्रकार वडिलांना सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

संबंधित बातम्या :

VIDEO | कल्याणमध्ये कबड्डीपट्टूंमध्ये राडा, दोन नामांकित कबड्डी खेळाडूंना मारहाण

जलकुंभाची पाहणी करणाऱ्या अभियंत्याला नशेखोरांची मारहाण, औरंगाबादच्या सिडको परिसरातील प्रकार