जलकुंभाची पाहणी करणाऱ्या अभियंत्याला नशेखोरांची मारहाण, औरंगाबादच्या सिडको परिसरातील प्रकार

मारहाण करणारे हे नशेखोर असल्याचे कनिष्ठ अभियंता देवरे यांनी सांगितले. या प्रकरणी कनिष्ठ सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जलकुंभाची पाहणी करणाऱ्या अभियंत्याला नशेखोरांची मारहाण, औरंगाबादच्या सिडको परिसरातील प्रकार
सिडको परिसरात जलकुंभाची पाहणी करणाऱ्या अभियंत्यावर नशेबाजांचा हल्ला.
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 2:35 PM

औरंगाबाद: शहरातील सिडको परिसरातील जलकुंभाची पाहणी करण्यासाठी गेलेले मनपाचे कनिष्ठ अभियंता भूषण देवरे यांच्यावर नशेखोरांच्या टोळीने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी सकाळी 10.30 वाजता घडली. औरंगाबाद शहरातील नशेबाजांवर आळा घालण्याचे मोठे आव्हान औरंगाबाद पोलिसांसमोर आहे.

टवाळखोर नशेबाजांचा अड्डा

महापालिकेचे सिडको एन-5 येथे जलकुंभ आहेत. तसेच खासगी रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या मरिमाता मंदिराजवळ दोन जलकुंभ आहेत. येथे काही टवाळखोर दिवसभर नशा करत बसलेले असतात. त्यामुळे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरणकुमार धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मरिमाता परिसरात स्वच्छता करून घेण्यात आली. या ठिकाणी बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात आला. नशेखोरांना वारंवार हाकलून देण्यात येत होते. बुधवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता भूषण देवरे हे मरिमाता मंदिर परिसरातील जलकुभांची पाहणी करण्यासाठी गेले होते. जलकुंभाच्या प्रवेशद्वारासमोर देवरे वाहन लावत असतानाच एकाने पाठीमागून त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यानंतर आठ ते दहा जणांनी शस्त्र व लाकडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.

अभियंत्यावर घाटी रुग्णालयात उपचार

देवरे यांनी कार्यकारी अभियंता किरणकुमार धांडे यांना हल्ला झाल्याची माहिती देऊन मदत मागितली. एन-5 जलकुंभावरील कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच तेदेखील धावत आले. धांडे यांनी तातडीने देवरे यांना घाटीत नेऊन त्यांच्यावर उपचार केले. मारहाण करणारे हे नशेखोर असल्याचे देवरे यांनी सांगितले. या प्रकरणी कनिष्ठ सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी मंगळसूत्र चोरीच्या तीन घटना

बुधवारी घडलेल्या आणखी काही घटनांमध्ये मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्या आहे. नवरात्रीनिमित्त महिला भाविक मोठ्या संख्येने कर्णपुऱ्यात देवीच्या दर्शनासाठी जातात. ही संधी साधून रात्री व पहाटेच्या अंधारात बुधवारी मंगळसूत्र चोरीच्या तीन घटना समोर आल्या. यात एका अल्पवयीन मुलीला रंगेहाथ पकडण्यात आले. कैलासनगरातील राणी विनोद बताडे (39) या भाऊ अनिल गुलाब रेड्डी यांच्या घरी गेल्या होत्या. मंगळवारी रात्री आठ वाजता भाऊ व कुटुंबासह पदमपुऱ्यातून कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी पायी गेले. दर्शन करून हॉटेल पंचवटीमार्गे त्या10.30 वाजता घराच्या दिशेने पायी जात होत्या. पीडब्ल्यूडी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळून जाताना अचानक एक तरुण आला. त्याने राणी यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली. नंतर विरुद्ध दिशेला पळाला. तेथे थांबलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून पळून गेला. रिमझिम पाऊस व अंधार असल्याने त्याचा पाठलाग करणे शक्य झाले नाही. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळसूत्र चोरी प्रकरणी अल्पवयीन मुलगी पकडली

मुकुंदवाडीतील एक महिला बुधवारी पहाटे कुटुंबासह दर्शनासाठी गेली होती. गर्दीत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची जाणीव झाली. त्यांनी आरडाओरड करताच नागरिकांनी अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला. हे कळताच छावणीचे उपनिरीक्षक सचिन वायाळ, अय्युब पठाण, श्रीकांत सपकाळ, जमीर तडवी, अविनाश दाभाडे यांनी धाव घेत मुलीला पकडले. तिच्याकडे चोरलेले मंगळसूत्र सापडले. ही मुलगी अहमदनगरहून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली. तर तिसऱ्या एका घटनेत जळगाव रस्त्यावरील रेणुकामाता मंदिरात दर्शनासाठी आलेल्या 23 वर्षीय महिलेची अर्ध्या तोळ्याची पोत चोरीला गेली. बुधवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. चोराने पोत हिसकावल्यानंतर मागे वळून बघितल्यानंतर चोर पळून गेला.

इतर बातम्या- 

औरंगाबाद : प्रसिद्ध खुलताबाद ऊरुसात यंदा सांस्कृतिक कार्यक्रम नाहीत, यात्रा रद्द, बालक व वृद्धांना घरीच थांबण्याचे आवाहन

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.