धक्कादायक, नागपुरात दर महिन्याला 18 महिलांवर अत्याचार; विनयभंग, अपहरणाची संख्या वाढली!

| Updated on: Oct 13, 2021 | 9:10 AM

मागील काही महिन्यांपासून महिला अत्याचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला असताना नागपुरातील महिलांसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये या वर्षी वाढ दिसून आली आहे. 2019 आणि 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये एकूण गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. विशेषत: महिला अत्याचारांचे वाढलेले प्रमाण चिंतेची बाब आहे.

धक्कादायक, नागपुरात दर महिन्याला 18 महिलांवर अत्याचार; विनयभंग, अपहरणाची संख्या वाढली!
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us on

नागपूर : मागील काही महिन्यांपासून महिला अत्याचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला असताना नागपुरातील महिलांसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये या वर्षी वाढ दिसून आली आहे. 2019 आणि 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये एकूण गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. विशेषत: महिला अत्याचारांचे वाढलेले प्रमाण चिंतेची बाब आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत दर महिन्याला शहरात 110 गुन्हे दाखल झाले आहेत. यात महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांची संख्या महिन्याला 18 इतकी आहे. माहिती अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती उघड

नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकाराअंतर्गत नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार महिला अत्याचारांचे 2019 मध्ये 136 (दर महिन्याला 11), 2020 मध्ये 172 (दर महिन्याला 14) गुन्हे नोंदविले गेले. 2021 मध्ये ऑगस्ट महिन्यात 149 गुन्हे (दर महिन्याला 18) गुन्हे नोंदविण्यात आले.

कोरोना काळात गुन्ह्यांमध्ये वाढ

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान लॉकडाऊनमध्ये लोक मोठ्या संख्येने घरात होते. त्यानंतरही या काळात नागपुरात महिला तस्करी, बलात्कार, बाललैंगिक यासह महिलांसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये वाढ झालीय. माहिती अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी हे वास्तव पुढे आणलंय.

नागपूर क्राईम सिटी?

नागपुरात २०१९ या वर्षाच्या तुलनेत लॅाकडाऊन असलेल्या २०२० आणि २०२१ च्या ऑगस्ट महिन्यापर्यंत महिला तस्करी, बलात्कार, बाललैंगिक गुन्ह्यामध्ये वाढ झालीय. २०१९ मध्ये नागपुरात महिला तस्करीचे १८, बलात्काराचे १३६, बाललैंगिक अत्याचार पोक्सोचे २०० गुन्हे दाखल होते. तर २०२० मध्ये त्यात वाढ होऊन महिला तस्करीचे ३३ गुन्हे, १७२ बलात्काराचे गुन्हे, २३८ पोक्सोचे गुन्हे नोंदवले गेलेय. तर यंदा १ जानेवारी २०२१ ते ऑगस्ट २०२१ या आठ महिन्यात नागपुरात महिला तस्करीचे १०, बलात्काराचे १४९, बाललैंगिक पोक्सोचे १४२ गुन्हे दाखल झाले. यामुळे नागपूरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

(Maharashtra Nagpur Crime assault against 18 women per month in Nagpur)

हे ही वाचा :

डुलकी लागल्याने ट्रक चालकाची धडक, अपघातानंतर जखमी तरुणाला मारहाण करुन पलायन

पुण्यातील कबड्डीपटू मुलीच्या हत्येने मान खाली, राक्षसांना वेळीच ठेचायला हवं, अजितदादांचा संताप

नात्यातील तरुण, एकतर्फी प्रेम, रागाच्या भरात अल्पवयीन मुलीवर कोयत्याने वार, क्षणात जीव घेतला, महाराष्ट्र हादरला