Nagpur Firing : नागपूरमध्ये सिगरेटचा वाद विकोपाला गेला अन् सीआरपीएफच्या निवृत्त जवानाने गोळीबार केला, एक जण जखमी

एमआयडीसी पोलीस पोलीस स्टेशन हद्दीतील स्वस्ती नगरमध्ये सीआरपीएफमधून निवृत्त जवान गणेश प्रसादचे दुकान आहे. त्या दुकानात सकाळी दोघे जण आले आणि त्यांनी 20 सिगरेटची मागणी केली. मात्र दुकानदाराने 20 सिगरेट देऊ शकत नाही, असं सांगितलं. त्यातून यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. आरोपी त्या ठिकाणावरून निघून गेले, मात्र थोड्या वेळाने ते हातात विळा आणि काठी घेऊन पुन्हा परत आले.

Nagpur Firing : नागपूरमध्ये सिगरेटचा वाद विकोपाला गेला अन् सीआरपीएफच्या निवृत्त जवानाने गोळीबार केला, एक जण जखमी
नागपूरमध्ये सिगरेटच्या वादातून गोळीबारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 8:36 PM

नागपूर : नागपुरात सिगरेटच्या वादातून गोळीबार (Firing) झाल्याची घटना एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडली आहे. या गोळीबारात एक जण जखमी (Injured) झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. फायरिंग करणारा हा सीआरपीएफ (CRPF)चा निवृत्त जवान असून त्याच्याकडे लायसन्स असलेली बंदुक होती. गणेश प्रसाद असे या सीआरपीएफ जवानाचे नाव आहे. सिगरेट मागण्यावरून झालेला हा वाद विकोपाला पोहचला आणि एकमेकांना मारहाण करण्यापासून फायरिंगपर्यंत पोहचला. त्यामुळे शुल्लक कारणावरून घडलेली ही घटना चिंतेचा विषय आहे.

पत्नीला मारहाण केल्याने निवृत्त जवानाने फायरिंग केले

एमआयडीसी पोलीस पोलीस स्टेशन हद्दीतील स्वस्ती नगरमध्ये सीआरपीएफमधून निवृत्त जवान गणेश प्रसादचे दुकान आहे. त्या दुकानात सकाळी दोघे जण आले आणि त्यांनी 20 सिगरेटची मागणी केली. मात्र दुकानदाराने 20 सिगरेट देऊ शकत नाही, असं सांगितलं. त्यातून यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. आरोपी त्या ठिकाणावरून निघून गेले, मात्र थोड्या वेळाने ते हातात विळा आणि काठी घेऊन पुन्हा परत आले. त्यावेळी दुकानदाराची पत्नी दुकानात होती, त्यांनी तिला मारहाण केली. हे पाहून दुकानदार धावून आला आणि त्यांच्यात वाद वाढला. त्यात आरोपीने त्याला मारहाण केली. यानंतर निवृत्त जवानाने घरात जाऊन आपली बंदूक आणली आणि त्यातून फायर केलं. त्यातील एक गोळी एकाच्या खांद्याला लागली, त्यात तो जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस अधिख तपास करीत आहेत. (One person was injured in a firing incident by a retired CRPF jawan over a cigarette dispute in Nagpur)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.