AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होळीनिमित्त गावी परतत असताना झाला घात; कारमधील दोन जण जागीच गेले

बिसेन, संतलाल व रितू हे छत्रपती संभाजीनगर येथे काम करत होते. होळीनिमित्त त्यांना मूळ गावी बालाघाट येथे जायचे होते. आदित्य एकटा असल्याने पुण्याहून कारने नागपूरला येत होता.

होळीनिमित्त गावी परतत असताना झाला घात; कारमधील दोन जण जागीच गेले
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Feb 28, 2023 | 9:29 AM
Share

नागपूर : नागपूर-मुंबई महामार्गावर कोंढाळीजवळ ट्रक व कारची धडक झाली. यात ट्रकने कारला चिरडले. या अपघातात दोन जण जागीच ठार तर दोन जखमी झाले. हे दोन मित्र होळीनिमित्त गावी परतत असताना हा अपघात झाला. नागपूर-मुंबई महामार्गावर कोंढाळीपासून ७ किमी अंतरावर खुर्सापार पोलीस चौकी जवळची घटना घडली. दोन जखमींना महामार्ग पोलिसांनी कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. कोंढाळी येथील घटनेत वेगात जाणार्‍या ट्रकने विरुद्ध दिशेने येणार्‍या कारला धडक दिली. त्यात कारचालकासह अन्य एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दाम्पत्य गंभीर जखमी झाले. ही घटना काटोलजवळील कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील खुर्सापार येथील महामार्ग पोलीस केंद्राजवळ सोमवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. कारचालक आदित्य सुखदेव माने (वय ३२, रा. पुणे) व बिसेन पवन मराठे (वय २२, रा. बालाघाट) अशी मृतांची नाव आहेत.

जखमींवर कोंढाळी आरोग्य केंद्रात उपचार

संतलाल कमललाल पंचेश्‍वर (वय २५) व रितू संतलाल पंचेश्‍वर (वय २0, जि. बालाघाट) अशी जखमींची नावे आहेत. चौघेही कारने छत्रपती संभाजीनगर येथून अमरावतीमार्गे नागपूरच्या दिशेने येत होते. खुर्सापार शिवारात वाराणसी येथून नागपूर-अमरावतीमार्गे मुंबईच्या दिशेने जाणार्‍या ट्रकने कारला धडक दिली. या अपघातात कार रस्त्यावरच उलटली. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमींवर उपचार सुरू आहे.

तीन जण जात होते गावाला

बिसेन, संतलाल व रितू हे छत्रपती संभाजीनगर येथे काम करत होते. होळीनिमित्त त्यांना मूळ गावी बालाघाट येथे जायचे होते. आदित्य एकटा असल्याने पुण्याहून कारने नागपूरला येत होता. आदित्यने त्यांना प्रवासी म्हणून सोबत घेतले होते. अपघात झालेला राष्ट्रीय महामार्ग हा चौपदरी आहे. बहुतांश वाहने खूप जोराने जात असतात. शिवाय या महामार्गावर कोंढाळी-तळेगाव या लेनच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या लेनवरील वाहतूक तळेगाव-कोंढाळी लेनवर वळवली आहे. दोन्ही बाजूने वाहतूक सुरू असल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जाते.

Follow Us
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल