Anil Bonde : मेळघाटमधील मुलीला पळवून हैदराबादेत नेलं, विवाहानंतरची आपबिती तिनं सांगितली

स्वप्नील उमप

| Edited By: |

Updated on: Sep 11, 2022 | 10:16 PM

दोन मुलींच्या सहाय्याने तिला हैदराबादला नेले. मुस्लीम पद्धतीने माझा बळजबरीने विवाह केल्याचं पीडित तरुणीने सांगितलं.

Anil Bonde : मेळघाटमधील मुलीला पळवून हैदराबादेत नेलं, विवाहानंतरची आपबिती तिनं सांगितली

अमरावती :अमरावतीचा मेळघाटमधील (Melghat) एका तरुणीला अकोला जिल्ह्यातील एका मुस्लीम तरुणाने पळवून लावले. 22 मे रोजी तरुणीला धमकी देऊन तिला हैदराबादमध्ये (Hyderabad) नेले. तिथं एका मौलानाच्या घरी मुस्लीम पध्द्तीने विवाह लावला. असा आरोप खासदार डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) यांना भेटण्यासाठी आलेल्या पीडित तरुणीने केला. मेळघाटमधील मुलीला बळजबरीने नेऊन तिच्याशी विवाह केल्याचा आरोपही खासदार बोंडे यांनी केला. या धक्कादायक प्रकरण लव्ह जिहाद आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार करणार आहे. या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी गृहमंत्री यांच्याकडे करणार असल्याचं अनिल बोंडे यांनी सांगितलं.

बळजबरीने विवाह केल्याचा आरोप

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील एका गावातील एका तरुणीला अकोटमधील एका मुस्लीम तरुणाने धमकी दिली. दोन मुलींच्या सहाय्याने तिला हैदराबादला नेले. हैदराबादला नेऊन मुस्लीम पद्धतीने माझा बळजबरीने विवाह केल्याचं पीडित तरुणीने सांगितलं.

लग्नानंतर अत्याचार, मारहाण

लग्नानंतर अनेकदा अत्याचार मारहाण आणि मारहाण केल्याचंही आरोप या तरुणीने केला. तसेच परिवर्तन करण्यासाठी ते जबरदस्ती करत असल्याचही तरुणी म्हणाली. या तरुणीने लपून आईशी फोनवर संवाद साधला. त्यानंतर त्या तरुणीची आई, भाऊ, जावयांच्या मदतीने तिला हैदराबादमधून सोडवण्यात आले.

हे सुद्धा वाचा

एसआयटी चौकशीची मागणी

आज या पीडित मुलीनी व तिच्या आईने भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची भेट घेतली आहे.या प्रकरणी पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला. या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा, यासाठी एसआयटी चौकशीची मागणीही अनिल बोंडे यांनी केली आहे. पोलीस काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI