अस्वस्थ वाटू लागल्यामुळे बॉडी बिल्डरचा…, डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज धक्कादायक
नालासोपाऱ्यात 27 वर्षाच्या बॉडी बिल्डरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्याच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर डॉक्टरांना प्राथमिक अंदाज सुध्दा धक्कादायक आहे.

नालासोपारा : 27 वर्षाच्या बॉडी बिल्डरचा (body builder) दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. त्या तरुणाला घरी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे घरच्यांनी तातडीने जवळच्या महापालिकेच्या रुग्णालयात (palika hospital) दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा अशी प्राथमिक माहिती डॉक्टरांनी जाहीर केली आहे. त्या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी (NALASOPARA NEWS) त्या तरुणाच्या घरच्यांची चौकशी केली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिस पुढील चौकशी करणार आहेत अशी माहिती समजली आहे. आतापर्यंत बॉडी बिल्डर तरुणाचा अशा पद्धतीने मृत्यू झाला आहे.
27 वर्षाच्या बॉडी बिल्डरच दुर्दैवी मृत्यू
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा अशी प्राथमिक माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितली आहे. अजिंक्य कदम असे 27 वर्षीय बॉडी बिल्डर तरुणाचे नाव आहे. तो नालासोपारा पूर्व मोरे गाव आरंभ कॉलनीमध्ये राहत होता. काल मंगळवारी सकाळी अचानक त्याला अस्वस्थ वाटत असल्याने त्याला जवळच्या महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले होते. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पालघर जिल्ह्यात विविध पारितोषिक जिंकली
अविवाहित असलेल्या अजिंक्याने 75 kg वजनात आपल्या बॉडी बिल्डिंगच्या माध्यमातून, पालघर जिल्ह्यात विविध पारितोषिक जिंकली होती अशी माहिती तिथल्या नागरिकांनी दिली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, तीन भाऊ आणी एक बहीण आहे. त्यांच्या भावडांमध्ये तो सगळ्यात मोठा होता. अचानक त्याच्या जाण्याने कदम कुटुंबासह एक दुःखाचा डोगर कोसळला आहे. त्याचबरोबर त्यांच्या मित्रांना सुध्दा धक्का बसला आहे.
