Nanded : नांदेडमध्ये नरबळी? जंगलात मृतदेहाशेजारी अघोरी पूजेचं साहित्य आढळल्यानं खळबळ

8 सप्टेंबर रोजी पांडुरंग तोटेवाड या तरुणाची हत्या करण्यात आली होती. तेलंगणा बॉर्डरवर असलेल्या वाशीच्या जंगलात या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मृत युवक हा आपल्या घराशेजारी बसलेला होता. त्यावेळी त्याला काहीतरी आमीष दाखवून बोलवण्यात आलं.

Nanded : नांदेडमध्ये नरबळी? जंगलात मृतदेहाशेजारी अघोरी पूजेचं साहित्य आढळल्यानं खळबळ
नांदेडमध्ये तरुणाची हत्याImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 10:32 AM

नांदेड : नांदेड (Nanded Crime News) जिल्ह्यातील हिमायतनगर (Himayat Nagar) तालुक्यातील वाशीच्या जंगलात एका युवकाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह सापडलाय. हिमायतनगर शहरात राहणाऱ्या 32 वर्षीय पांडुरंग तोटेवाड या युवकाचा हा मृतदेह असल्याची ओळख पटलीय. या मृतदेहाशेजारी अघोरी पूजेचे साहित्य आढळलंय. त्यामुळे मयत तरुणाच्या कुटुंबियांनी नरबळीची शंका उपस्थित केलीय. त्यानुसार उपविभागीय पोलीस (Nanded Police) अधिकाऱ्याकडून हत्येचा तपास करण्यात येतोय. मृतदेह आणि अघोरी पूजेचं साहित्य आढळलेल्याचा एक व्हिडीओही नांदेडमध्ये व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे अधिकच खळबळ उडाली आहे.

दगडाने ठेचलं

मृतदेह ज्या ठिकाणी आढळून आला, त्या ठिकाणी अघोरी पुजेचं साहित्य सापडल्यानं अनेक शंका घेतल्या जात आहेत. शिवाय मृत तरुणाचा चेहराही छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला आहे. दगडाने ठेचून निर्घृणपणे या तरुणाची हत्या करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिघा पुरुषांवर गुन्हा दाखल केला आहे. कलम 302, 34 अन्वये एकूण चार जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी अधिक तपास केला जातोय.

नेमकं काय घडलं?

8 सप्टेंबर रोजी पांडुरंग तोटेवाड या तरुणाची हत्या करण्यात आली होती. तेलंगणा बॉर्डरवर असलेल्या वाशीच्या जंगलात या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मृत युवक हा आपल्या घराशेजारी बसलेला होता. त्यावेळी त्याला काहीतरी आमीष दाखवून बोलवण्यात आलं. वाशीच्या जंगल परिसरात घेऊन जाऊन इतर साथीदारांच्या मदतीने त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. दरम्यान, हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून त्याचा अपघात झाल्याचं भासवण्याचा प्रयत्नही करण्यात आला, असा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केलाय.

हे सुद्धा वाचा

पाहा लाईव्ह घडामोडी : Video

पोलीस तक्रारीत काय?

बालाजी तोटेवाड यांनी तरुणाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तरुणाची जुन्या वादातून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आलाय. परमेश्वर लक्ष्मण अक्कलवाड, लक्ष्मण अक्कलवाड, रमेश लक्ष्मण अक्कलवाड, लक्ष्मीबाई लक्ष्मण अक्कलवाड यांनी संगनमताने हे हत्याकांड केलं, अशी तक्रार हिमायतनगर पोलीस ठाण्यात देण्यात आलीय.

धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाशेजारी लिंब, तांब्या आणि फुलं आढळून आली आहेत. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार असल्याचा आरोप करण्यात आलाय. पोलिसांनीही या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरु केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी हत्या झालेल्या ठिकाणाची पाहणी केली. पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर, जमादार हेमंत चोले, अशोक सिंगणवाड यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या हत्याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.