AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंध भावाचा बदला घेण्यासाठी त्याच्या डोळस मुलीचं अपहरण करत हत्या! नांदेडमध्ये रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना

Nanded Murder : आरोपीला त्याच्या भावाने त्रास दिला होता, त्याचा बदला घेण्यासाठी त्याच्या मुलीची हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिलीय. आंधळ्या जोडप्याला या डोळस मुलीचा आधार होता म्हणूनच मी तिला मारलं अशी कबुली आरोपीने दिलीय.

अंध भावाचा बदला घेण्यासाठी त्याच्या डोळस मुलीचं अपहरण करत हत्या! नांदेडमध्ये रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना
अंध दाम्पत्याच्या मुलीची हत्या..Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Aug 20, 2022 | 2:51 PM
Share

नांदेड : रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना नांदेडमधून (Nanded Crime News) समोर आली आहे. नांदेडमध्ये एका सहा वर्षांच्या चिमुकलीचं तिच्या काकाने अपहरण करुन हत्या (Nanded Murder News) केली असल्याचं खुलासा पोलिसांच्या तपासातून समोर आलाय. ही मुलगी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर अनेक शंका घेतल्या जात होता. दरम्यान, या मुलीच्या अंध वडिलांनी आपल्या भावावार मुलीचं अपहरण केल्याचा आरोप केला होता. नांदेड (Nanded News) शहरातील तेहरा नगर भागातील अंध दाम्पत्याचा डोळस आधार असलेल्या सहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण केल्यानंतर तिचे प्रेत नदीत आढळून आले होते. या प्रकरणात पोलिसांनी मुलीच्या काकाला बेड्या ठोकल्या आहेत. काकाने या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. रेल्वेत खाद्यपदार्थ विकणाऱ्या अंध दाम्पत्याचा सहा वर्षीय मुलगीच मोठा आधार होती. 13 ऑगस्ट रोजी घरासमोरून तिचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला, पण ती सापडली नाही. शुक्रवारी गोदावरी नदी पात्रात तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती.

पोलिसांच्या चौकशीत काय आढळलं?

पोलिसांच्या चौकशीत त्या मुलीला तिच्या काकासोबत काही महिलांनी पाहिले होते. परंतु त्यानंतर तो पसार झाला होता. मयत मुलीच्या वडिलांनी ही तिच्या कानात असलेल्या दागिन्यांसाठी काकाने अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर शिवाजी नगर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि माने, सहाय्याक पोली निरीक्षक शिवसांभ घेवारे यांनी शनिवारी रात्री शहरातील सहारा लॉज येथून आरोपी संतोष सखाराम हटेकर याला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान शवविच्छेदन अहवालानंतर चिमुकलीवर अत्याचार झाला का याचा खुलासा होऊ शकणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भावाच्या त्रासाचा बदला

आरोपीला त्याच्या भावाने त्रास दिला होता, त्याचा बदला घेण्यासाठी त्याच्या मुलीची हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिलीय. आंधळ्या जोडप्याला या डोळस मुलीचा आधार होता म्हणूनच मी तिला मारलं अशी कबुली आरोपीने दिलीय. या मुलीच्या आठवणीत आपल्या भावाला रोज दुःख झालं पाहिजे असा आपला हेतू असल्याचेही आरोपीने पोलिसांना सांगितलंय. इतकंच काय तर मला मारू नका मी सगळं खरं ते सांगतो अस सांगून आरोपीने चक्क पोलिसांना कोर्टात बघून घेण्याची भाषा वापरल्याची चर्चा आहे.

या प्रकारामुळे आरोपीच्या भयानक कोर्याबाबत पोलीस देखील चक्रावून गेलेत. हा आरोपी विक्षिप्त आणि तितकाच खतरनाक असल्याचे एका पोलीस कर्मचाऱ्यानी सांगितले. विशेष म्हणजे भावाच्या मुलीची हत्या करणाऱ्या या आरोपीलाही दोन मुलीच आहेत. मात्र तरीही त्याने थंड डोक्याने मुलीची हत्या केल्याने त्याच्या डोक्यात किती संताप असेल, याची निव्वल कल्पनाच केलेली बरी.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.