AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थेंबभर पावसात लाईट गुल्ल, अंधारात चोरट्यांचा नुस्ता धुमाकूळ, बियाणींच्या धड्यानंतरही नांदेड पोलीस थंडगार!!!

बियाणी हत्याकांडानंतर शहरातील cctv कॅमेरे चालू होतील, गस्त वाढेल, खबऱ्यांचे नेटवर्क उभारल्या जाईल अशी अपेक्षा केली जात होती. मात्र पोलिसांनी काहीच धडा घेतला नाही,असेच चित्र शहरात झालेल्या चोऱ्यावरून दिसतंय.

थेंबभर पावसात लाईट गुल्ल, अंधारात चोरट्यांचा नुस्ता धुमाकूळ, बियाणींच्या धड्यानंतरही नांदेड पोलीस थंडगार!!!
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 09, 2022 | 3:24 PM
Share

नांदेड : नांदेडमध्ये बुधवारी रात्रीला झालेल्या किरकोळ पावसानंतर वीजपुरवठा खंडित झाला होता. याचाच फायदा घेऊन चोरट्यांनी (Nanded theft) शहरात अक्षरशः धुमाकूळ घातलाय. एका मटण विक्रेत्यांचे घर चोरट्यानी साफच केलंय तर तीन दुकान फोडून लाखोंचा ऐवज घेऊन चोरटे पसार झालेत. पोलीस मात्र नेहमीप्रमाणे शोध घेत आहेत, असं सांगण्यात आलंय. काल रात्रीच्या अंधाराच फायदा मात्र चोरट्यांनी चांगलाच घेतलाय. विशेष म्हणजे नांदेडच्या मुख्य वस्तीत चोरीच्या ह्या घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. वझीराबाद (Wazirabad) ही नांदेडमधील मुख्य वस्ती असून येथील मुख्य रस्त्यावरच्या दोन दुकानात चोरी झाली. गवळपुरा भागातील मटण विक्रेत्याच्या घरून 20 लाखांचा माल लंपास झाला. रात्रीतून चोरट्यांचा हा धुमाकूळ चालू असताना पोलीस (Nanded Police) काय झोपा काढत होते का? असा सवाल नागरिक विचारत आहेत. कारण पोलीस जागे असते तर ते ड्युटीवर, गस्तीवर असते. एकाच रात्रीतून एवढ्या घटना घडल्या तर त्याची साधी कुणकुणही पोलिसांना नसावी? की झोपेचं सोंग घेतलेल्या पोलिसांनी चोरट्यांच्या या कारवायांकडे लक्षच द्यायचं नाही असं ठरवलंय?

वझीराबादेत तीन दुकानं फोडली

नांदेडमध्ये वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कमल काँप्लेक्स मधलं एक कपड्याचे आणि त्याच्या बाजूलाच असलेले स्कुल बॅगच्या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यानी गल्ल्यात असलेली रोख रक्कम आणि काही कपडेही पळवले आहेत. तसेच आता शाळा सुरू होणार असल्याने स्कुल बॅग विक्रेत्याने मोठ्या प्रमाणात बॅगची खरेदी करून ठेवली होती. त्याच्या दुकानातून चोरट्यानी बॅगा देखील लांबवल्या आहेत. मुख्य रस्त्यावरच्या ह्या दोन दुकानात चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. आणखी एका दुकानाचे असेच शटर वाकवून चोरीचा प्रयत्न चोरट्याने केला पण तो यशस्वी झाला नाही.

वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरटे मुक्कामी

नांदेडमध्ये झालेल्या ह्या तिन्ही चोरीच्या प्रमुख घटना ह्या वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत. वजीराबाद म्हणजे नांदेडचे मध्यवर्ती ठिकाण आहे, सगळी महत्वाची शासकीय कार्यालये, जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय याच हद्दीत आहे. त्यामुळे रात्री देखील या भागात पोलीस कर्मचाऱ्यांचा संचार असतो, मात्र तरीही चोरट्यानी संधी साधत पोलिसांनाच आव्हान दिल्याचे दिसतंय.

गवळीपुरा भागात 20लाखांचा माल लंपास

गवळीपुरा भागात नईम कुरेशी नावाचे मटण विक्रेते राहतात, नईम यांना चार भाऊ असून ते सगळेच मटण विक्रेते आहेत. शहरातील नवा मोंढा भागात त्यांची मटण विक्रीची दुकाणे आहेत. बकरे खरेदीसाठी पहाटे लवकर गावोगावी जावे लागते म्हणून ह्या चार ही भावांनी घरातच पंधरा लाखाहून अधिकची रोकड ठेवली होती. तसेच घरात जवळपास पाच लाखांचे दागिने देखील होते, रात्री अज्ञात चोरट्यानी पैसे असलेल्या खोलीचे कुलूप तोडून हा जवळपास वीस लाखांचा मुद्देमाल पळवला आहे. या चोरीने हे खाटीक कुटुंब उघड्यावर आलय.

बियाणींच्या हत्येनंतरही पोलीस थंडावलेलेच!

नांदेडमध्ये दोन महिन्यांपूर्वी दिवसा ढवळ्या गोळीबार करत बिल्डर संजय बियाणीची हत्या झाली होती. या हत्ये नंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड टीका झाली, किमान त्या नंतर तरी पोलिसांच्या कार्यप्रणालीत सुधारणा होईल अशी नांदेडकरांना अपेक्षा होती. शहरातील cctv कॅमेरे चालू होतील, गस्त वाढेल, खबऱ्यांचे नेटवर्क उभारल्या जाईल अशी अपेक्षा केली जात होती. मात्र पोलिसांनी बियाणींच्या हत्येपासूनदेखील काहीच धडा घेतला नाही,असेच चित्र शहरात झालेल्या चोऱ्यावरून दिसतंय.

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.