NASHIK NEWS | नाशिक पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच, भाईगिरी करणाऱ्यांना…

मागच्या काही दिवसांपासून नाशिक पोलिस सोशल मीडियावर अधिक लक्ष ठेऊन आहेत. कारण भाईगिरी आता व्हिडीओच्या माध्यमातून सुरु केली आहे. यापुढे अशा पद्धतीचा व्हिडीओ आढळल्यास त्यांची हयगय केली जाणार नाही.

NASHIK NEWS | नाशिक पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच, भाईगिरी करणाऱ्यांना...
Nashik crime news in marathi (1)Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 9:37 AM

नाशिक : मागच्या दोन दिवसांपूर्वी नाशिक (nashik news) जिल्ह्यात जिल्ह्यात एका तरुणांचा खून झाला. हा खूप भरदिवसा बाजारपेठेत झाल्यामुळे गँगवार (nashik gang war) पुन्हा चर्चेत आलं आहे. दोन्ही ग्रुपकडून एकमेकांना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही ग्रुप एकमेकांना संपवण्याच्या गोष्टी करीत होत्या. दोन्ही ग्रुपकडून सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल (viral video) करण्यात आले आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. त्यांना ज्या व्यक्तींनी मदत केली आहे, त्यांची सुध्दा चौकशी होणार असल्याची माहिती नाशिक पोलिसांनी जाहीर केली आहे.

संदीपला संपवल्यानंतर सोशल मीडियावर खुनाची कबुली

संदीप आठवले या तरुणाचा ओम पवार यांच्या टोळीने खून केला. विशेष म्हणजे संदीप आठवले याने ओम पवार याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे ओम पवार मनातून अधिक दुखी झाला होता. त्यामुळे संदीप आठवले याला संपवण्यासाठी ओम पवार नियोजन करीत होता. संदीप एका ठिकाणी येणार असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यावेळी पाच तरुणांनी त्याच्या असंख्य वार केले. ओम पवार या तरुणाने संदीपला संपवल्यानंतर सोशल मीडियावर खुनाची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला आणि त्यांच्या साथिदारांना अटक केली.

हे सुद्धा वाचा

भाईगिरी रील्स शेअर करणाऱ्यांना पोलिसांचा इशारा

“गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात कथित भाई आणि त्यांच्या समर्थकांकडून गुन्हेगारी, भाईगिरीचे रील्स सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. या आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. या कथित भाईंकडून वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हेगारी रिल्स शेअर केले जात आहेत. त्यातून गुन्हेगारी घटना घडत आहे. मागच्या आठवड्यात अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजी चौक येथे इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केल्याच्या वादातून एका तरुणाचा खून झाला होता” अशी माहिती किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, यांनी दिली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.