Nashik Crime : दोघांच्या वादात तिसऱ्याचा बळी, मित्रांच्या वादात पडला अन् जीवाला मुकला !

दोघा मित्रांचा वाद झाला. तिसरा मध्ये पडला आणि एकाची बाजू घेऊ लागला. यामुळे दुसरा दुखावला अन् त्याने जे केले त्याने नाशिक पुन्हा हादरले.

Nashik Crime : दोघांच्या वादात तिसऱ्याचा बळी, मित्रांच्या वादात पडला अन् जीवाला मुकला !
नाशिकमध्ये क्षुल्लक कारणातून मित्रांनीच मित्राला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 9:25 AM

नाशिक / 28 ऑगस्ट 2023 : नाशिकमध्ये हत्येचे सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. दररोज काही ना काही कारणातून हत्याकांड उघडकीस येत आहे. अशीच एक घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कार्बन नाका परिसरात घडली आहे. शिवीगाळ करणाऱ्या मित्राची बाजू घेतली म्हणून जिगरी दोस्तानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. विश्वनाथ सोनवणे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. वाढत्या हत्याकांडामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

काय आहे प्रकरण?

दोन-तीन दिवसांपूर्वी रफिख शेखला एका मित्राने शिवीगाळ केली होती. यावेळी मयत विश्वनाथने शिवीगाळ करणाऱ्या मित्राची बाजू घेतली होती. याचा राग रफिकच्या मनात खदखदत होता. यानंतर मयत विश्वनाथ सोनवणे, आरोपी समशेर रफिक शेख, दीपक अशोक सोनवणे आणि त्यांचे दोन-तीन मित्र दारु पित गप्पा मारत होते. यावेळी रफिकने इतर मित्रांसह विश्वनाथ याला मारहाण केली. तसेच रागाच्या भरात त्याच्या पोटात चाकू भोसकला. यात तो गंभीर जखमी झाला.

रुग्णालयात तैनात पोलिसाला संशय आला अन्…

जखमी विश्वनाथला आरोपींनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यावेळी रुग्णालयात तैनात असलेल्या पोलीस हवालदाराच्या सतर्कतेने संशयित आरोपी मित्रांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता दोघांनी रागाच्या भरात हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...