AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandara Accident : नातेवाईकांसोबत गप्पा मारत चालले होते पती-पत्नी, इतक्यात भरधाव ट्रकने धडक दिली अन्…

रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करुन नातेवाईक महिलेशी पती-पत्नी गप्पा मारत होते. पण त्यांची ही भेट अखेरची ठरली. भरधाव ट्रक आला अन् होत्याचं नव्हतं झालं.

Bhandara Accident : नातेवाईकांसोबत गप्पा मारत चालले होते पती-पत्नी, इतक्यात भरधाव ट्रकने धडक दिली अन्...
भंडाऱ्यात भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नी ठारImage Credit source: TV9
| Updated on: Aug 28, 2023 | 8:19 AM
Share

भंडारा / 28 ऑगस्ट 2023 : भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा येथे घडली. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तुमसर-मोहाडी राज्य मार्गावरील खरबी येथे ही घटना घडली. बालचंद ठोंबरे आणि वनिता ठोंबरे असे ट्रकच्या धडकेत ठार झालेल्या पती पत्नीचे नाव आहे. तर नलू दामोदर बडवाईक असे जखमी असलेल्या महिलेचे नाव आहे. अपघाताची माहिती कळताच मोहाडी-तुमसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पती-पत्नीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मोहाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहाडी पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार चरण वाघमारे यांनी भेट दिली.

रस्त्याच्या शेजारी नातेवाईक महिलेसोबत बोलत होते

भंडारा-तुमसर राज्यमार्गावरुन भंडाराहून तिरोडा अदानी कंपनीमध्ये कोळसा घेऊन ट्रक जात होता. यावेळी खरबी येथे महामार्गाच्या बाजूला दुचाकी उभी करुन पती-पत्नी आपल्या नातेवाईक महिलेसोबत बोलत होते. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला समोरुन जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले. तर एक महिला गंभीर जखमी झाली. मयत दुचाकी चालक बालचंद ठोंबरे हे रेल्वेमध्ये कार्यरत होते.

अपघात घडताच ट्रक चालकाने घटनास्थळावरून पोबारा करीत मोहाडी पोलीस ठाणे गाठले. सदर घटनेची माहिती होताच घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. घटनास्थळावरील वातावरण चिघळत असल्याचे लक्षात घेत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुमसर-मोहाडी येथील पोलीस दाखल झाले. तसेच भंडारा येथील राज्य राखीव दलाचा चमू सुध्दा दाखल झाला होता. सदर घटनेचा पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहेत.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.