Nashik Crime : ‘तुम्ही आता तुमच्या गावी जा’ असं म्हटल्याचा राग आला, मग साडूने साडूचा काटा काढला !

घरी वाद होता म्हणूून तो आपल्या कुटुंबासह साडूच्या घरी राहत होते. सहा महिने उलटले तरी तो आपल्या घरी जायये नाव घेत नव्हता. अखेर साडूने स्वतः त्याला घरी जाण्यास सांगितलं. यामुळे त्याला राग आला अन् विपरीत घडलं.

Nashik Crime : तुम्ही आता तुमच्या गावी जा असं म्हटल्याचा राग आला, मग साडूने साडूचा काटा काढला !
नाशिकमध्ये साडूे साडूला संपवले
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 17, 2023 | 1:37 PM

नाशिक / 17 ऑगस्ट 2023 : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्वतःच्या घरी परत जाण्यास सांगितलं म्हणून साडूने साडूची हत्या केल्याची घटना घडली आहे. कुऱ्हाडीने घाव घालत साडूने साडूची हत्या केली. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील सूर्यगड येथे ही घटना घडली. मनोहर राऊत असे मयत व्यक्तीचे नाव आहे. आरोपीने यावेळी पत्नी आणि मेव्हणीवरही हल्ला केला. या हल्ल्यात दोघीही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी सुरगाणा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यारही जप्त केले आहे. भास्कर परशराम पवार असे आरोपीचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी भास्कर पवार याला त्याचा चुलता हिरामण पवार हा त्रास देत होता. यामुळे भास्कर पवार हा आपल्या कुटुंबासोबत साडूच्या घरी राहत होता. गेल्या सहा महिन्यांपासून पवार कुटुंब मयताच्या घरी राहत होते. मात्र आता मयत राऊत यांनी त्यांना आपल्या गावी परत जाण्यास सांगितले. भास्करला जाण्यास सांगितल्याने राग आला. याच रागातून पहाटे चारच्या सुमारास त्याने मनोहर राऊत यांच्यावर कुऱ्हाडीने वार करुन त्यांची हत्या केली.

आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. त्यानंतर त्याने पत्नी आणि मेव्हणीवरही वार करुन त्यांना जखमी केले. आई आणि मावशीचा ओरडण्याचा आवाज ऐकून आरोपीचा मुलगा धावत आला. त्याने आरोपीच्या हातातील कुऱ्हाड काढून घेत आरोपीला पकडून ठेवले. घटनेची माहिती मिळताच सुरगाणा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करत आरोपीला ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला, तर जखमी महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.