Nagpur Crime : फसवणुकीसाठी सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा, टॅक्सीचे बिल बाकी असल्याचे सांगत अकाऊंटवर डल्ला

नागरिकांना लुटण्यासाठी सायबर गुन्हेगार नानाविविध युक्त्या शोधून काढतात. नागपूरमध्ये आता फसवणुकीचा नवा फंडा चोरट्यांनी शोधून काढला आहे. नागरिकांनी थोडी सतर्कता दाखवल्यास अशी फसवणूक टाळता येईल.

Nagpur Crime : फसवणुकीसाठी सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा, टॅक्सीचे बिल बाकी असल्याचे सांगत अकाऊंटवर डल्ला
नागपूरमध्ये सायबर गुन्हेगारांकडून प्रवाशांची फसवणूकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 17, 2023 | 7:15 AM

नागपूर / 17 ऑगस्ट 2023 : पैसे लुटण्यासाठी हल्ली गुन्हेगार काय करतील याचा नेम नाही. सध्या ओला, उबेर टॅक्सीमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांना लुटण्याचा नवा फंडा सायबर गुन्हेगारांचा सुरु आहे. भाडं चुकवल्यानंतरही काही भाडं शिल्लक असल्याचं सांगत पैसे पे करण्यासाठी लिंक पाठवतात. मग लिंकद्वारे पैसे लुटतात. सायबर पोलिसात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सायबर पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागपुरमध्ये गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. हत्या, चोऱ्या, हल्ले आदि घटनांनी नागपूर हादरले आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

काय आहे मोडस ऑपरेंडी?

सायबर गुन्हेगार ओला, उबरने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टार्गेट करतात. ओला, उबेरने टॅक्सी बुक केल्यानंतर ग्राहक पैसे पे करतात. मात्र त्यानंतर सायबर गुन्हेगार प्रवाशांना फोन करुन काही भाडं शिल्लक असल्याचे सांगत पैसे न दिल्यास कोर्टात खेचण्याची धमकी देतात. घाबरलेले प्रवासी लगेच सायबर पोलिसांनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करुन पैसे भरतात. याचवेळी आरोपी त्यांच्या खाते साफ करतात.

गेल्या काही दिवसात अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सायबर पोलिसात अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यानंतर पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. पोलीस प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच नागरिकांनाही अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी थोडी जागरूकता बाळगली तरी अशी फसवणूक टाळता येऊ शकते.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.